साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या दुसऱ्या टप्याच्या माता व बाल रूग्णालयाचा भूमीपूजन सोहळा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 December 2023

साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या दुसऱ्या टप्याच्या माता व बाल रूग्णालयाचा भूमीपूजन सोहळा

    किनवट : येथील साने गुरूजी इमर्जन्सी व मल्टिस्पेशालिटी हॉस्पीटलच्या दुसऱ्या टप्याचे माता व बाल रूग्णालयाचा भूमीपूजन सोहळा आज दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11.00 वाजता पार पाडला. या माता बाल रूग्णालयाच्या संपूर्ण बांधकामासाठी रमा पुरूषोत्तम फाऊंडेशन, पुणे यांनी आर्थिक मदत केली आहे.


विशेष म्हणजे या माता बाल रूग्णालयाचे भूमिपूजन सद्यस्थित साने गुरुजी रूग्णालयात जन्मलेल्या 11 बालके व त्यांच्या माता यांच्या हस्ते कुदळ मारून करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभाकरराव मुधोळकर हे होते. तर प्रमुख पाहूणे माजी नगराध्यक्ष इसाखान, प्रा. रामप्रसाद तौर, आर्कि. गौतम मेहता, अमेय समेळ, गिरीष सरदेसाई, अखिल पांड्या, प्रशांत मुसळे, हितेश शहा, उदय यादव, मिलिंद सर्पे, भारत जोडो यात्री पुरूषोत्तम जोशी, शुभांगी आबनवे, मुरलीधर बेलखोडे हे होते. आलेल्या प्रमुख पाहुण्यांच्या स्वागत शाल, पुष्पगुच्छ, छोटे रोपटे देऊन करण्यात आले.


  कार्यक्रमाच्या प्रास्तावनेत बोलतांना डॉ. अशोक बेलखोडे यांनी किनवट व परिसरातील महिला व बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असलेल्या या विभागाचे लवकरच बांधकाम पूर्ण करून सेवेसाठी सुरू करण्यात येईल. तसेच या संपूर्ण प्रकल्पातील आरोग्य सुविधा ही श्रीमंताना आवडणारी व गरीबांना परवडणारी असेल यात कसल्याही प्रकारचे दुमत नाही व पैसे नाहीत म्हणून कोणीही आरोग्य सुविधांपासून वंचित राहता कामा नये असे प्रतिपादीत केले.


यावेळी जेष्ठ नेते नारायणराव सिडाम, अशोक नेम्मानीवार, भूमन्ना बोल्लेवार, मुक्तीरामजी घुगे, आत्माराम मुंडे, ॲङ मिलिंद सर्पे, बालाजी धोतरे, प्रा. डॉ. सुरेंद्र शिंदे, प्रा. डॉ. द्वारकाप्रसाद वायाळ, प्रा. वसंत राठोड, डॉ. शिवाजी गायकवाड, डॉ. मधुसुदन यादव, कु. अश्विनी उईके, यांच्यासह सद्यस्थित साने गुरूजी रूग्णालयात प्रसुत झालेल्या मिराबाई गोवर्धन मुंडे, रूबिना शेख वजीर, लता दिनेश गेडाम, समिना फिरोज खान, मंगला किरवले यांच्यासह अनेक माता व बालके उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages