साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रुग्णालयाच्या वर्धापण दिनानिमीत्त सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 December 2023

साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रुग्णालयाच्या वर्धापण दिनानिमीत्त सांस्कृतीक कार्यक्रम संपन्न


किनवट : येथे साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या 28व्या वर्धापन दिनानिमीत्त शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सांयकाळी 5.00 वाजता साने गुरूजी रुग्णालयाच्या प्रांगणामध्ये करण्यात आले होते.


या कार्यक्रमात गायन, वादन, एकपात्री प्रयोग, नाटीका, लोककला व लोकनृत्य  इत्यादीचे सादरीकरण करण्यात आले. कु. इशिता पत्की, कु. दुर्वा भास्करवार, अर्णव कोट्टावार, पुजा डोंगरे, साईप्रसाद चाडावार, गौरव सोनी, यांच्यासह किनवट व परिसरातील विविध शाळेतील 40 स्पर्धकांनी आपली कला सादर केली. सादरीकरण केलेल्या सर्व स्पर्धकांना प्रोत्साहनपर पुस्तक भेट देण्यात आले.  या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होते.


कार्यक्रामचे सुत्रसंचलन श्री. ज्ञानेश्वर उईके व परिक्षण म्हणुन उत्तम कानिंदे, रुपेश मुनेश्वर व सुरेश पाटील यांनी केले तर कार्यक्रमाच्या यशस्वीयतेसाठी साने गुरूजी रूग्णालय परिवारातील सदस्यांनी परिश्रम घेतले.
No comments:

Post a Comment

Pages