जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळणार फिरते दुकान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 24 December 2023

जिल्ह्यातील दिव्यांगांना मिळणार फिरते दुकान


किनवट,दि.२४ : दिव्यांग व्यक्तींना स्वावलंबी होण्याच्यादृष्टीने हरित ऊर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही मोबाईल शॉप ऑन ई-व्हेईकल अर्थात फिरते वाहनावरील दुकान मोफत उपलब्ध करून देण्याची योजना राज्य शासनाने सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी दिव्यांगांनी चार जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत,असे आवाहन नांदेड जिल्हा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट चे अध्यक्ष अॅड.एम.यु.सर्पे यांनी केले आहे. 

   या योजनेला १० जून २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार मान्यता देण्यात आली आहे. या योजनेच्या अंमलबजावणीची कार्यवाही महाराष्ट्र दिव्यांग वित्त व विकास महामंडळ, मर्यादित यांच्या स्तरावरून सुरू आहे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी अर्जदार नावनोंदणी व अर्ज करण्यासाठी तीन डिसेंबरला पोर्टल प्रक्षेपित करण्यात आले आहे. दिव्यांगांनी ऑनलाइन अर्ज चार जानेवारी २०२४ रोजी सकाळी दहा वाजेपर्यंत करावेत.

No comments:

Post a Comment

Pages