किनवट,दि.२४ : साने गुरूजी जयंती व साने गुरूजी रूग्णालयाच्या २८ व्या वर्धापन दिनानिमीत्त उद्या(दि.२५) युवा कार्यशाळा, व्याख्यान व कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती भारत जोडो युवा अकादमी चे अध्यक्ष व साने गुरुजी रुग्णालयचे संचालक डॉ.अशोक बेलखोडे यांनी दिली.
सोमवारी (दि.२५) सकाळी १०:३० वाजता युवा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. अंधश्रध्दा निर्मुलनाचा कायदा - निर्मीती, उपयोगीता, अंमलबजावणी व समज - गैरसमज याबाबत अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष माधव बावगे, लातूर हे मार्गदर्शन करणार आहेत. सेवानिवृत्त प्राचार्या सविता शेटे, बीड ह्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा आहेत. सायंकाळी ५:३० वाजता पद्मविभूषण बाबा आमटे स्मृती व्याख्यानमाले निमीत्त डॉ. प्रल्हाद लुलेकर, छ. संभाजीनगर यांचे व्याख्यान होणार आहे. डॉ. वासूदेव मुलाटे, छ. संभाजीनगर हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत. रात्री ८ वाजता निमंत्रित व स्थानिकांचे कवी संम्मेलन होणार असून सुप्रसिध्द कवी - गितकार प्रकाश घोडके, पुणे प्रा. डॉ. विनायक पवार, पनवेल प्रा. डॉ. आदिनाथ इंगोले, नांदेड यांच्यासह स्थानिक कविंचा सहभाग राहणार आहे. प्रा. डॉ. राजेंद्र गोणारकर, नांदेड हे कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत.कार्यक्रमाचे समन्वयक प्रा. डॉ. पंजाब शेरे हे आहेत.
No comments:
Post a Comment