किनवट ता. २४ (बातमीदार):अंगणवाडी कार्यकर्ती आणि मदतनीस यांना सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा. यासह विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कार्यकर्त्या, मदतनीस यांनी ४ डिसेंबरपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले. त्यामुळे ग्रामीण भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके, कुपोषित बालकांना पोषण आहार मिळत नसल्यामुळे त्यांची आबाळ होत आहे.
यामुळे अंगणवाड्या कुलूप बंद असल्याने किलबिलाट थांबला आहे. एकात्मिक बालविकास सेवा योजनेद्वारे ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये सेविका व मदतनीस बालकांसाठी जागरूक असतात. या बालकांसह केंद्रातील बालकांच्या काळजी या सेविका, मदतनीस घेत असतात. परंतु शासनाने त्यांच्या आवश्यक मागण्यांकडे. लक्ष न दिल्याने मागील काही दिवसांपासून अंगणवाडी सेविका, मदतनिसांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. त्याचा परिणाम अंगणवाड्या व कार्यक्षेत्रातील बालके, गरोदर माता यांच्या पोषण आहारावर झाला आहे.
या अंगणवाडी सेविका रोज ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी बालकांना पोषण आहार शिजवून देत होत्या. मात्र, अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बालकांचा पोषण आहार थांबला आहे. बालकांचे रोजचे वजन, उंची होत नसल्यामुळे माहिती शासनापर्यंत पोचत नाही. प्रशासनाने केलेल्या उपाययोजना लाभार्थीपर्यंत पोचत नाही. त्यामुळे बालकांचे संप कालावधीत मोठे हाल होत आहेत.
No comments:
Post a Comment