नांदेड - येथील सप्तरंगी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित सप्तरंगी साहित्य मंडळाच्या जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे यावर्षीचे पुरस्कार जाहीर झाले असून त्यात सामाजिक , शैक्षणिक, सांस्कृतिक, साहित्य अशा विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा समावेश करण्यात आला आहे. यावर्षी जनसंवाद पुरस्कार अकरा जणांना प्रदान करण्यात येणार आहे. यात डॉ. हेमंत कार्ले, डॉ. हेमंत सोनकांबळे, माजी उपप्राचार्य प्रल्हाद हिंगोले, पत्रकार गंगाधर धडेकर, जयश्री फुलारी, गोविंद कवळे, आम्रपाली मादळे, रणजीत वर्मा, व्यंकटी कुरे, देविदास गोडगे, छाया कांबळे यांचा समावेश करण्यात आला आहे.
सप्तरंगी साहित्य मंडळ आणि आनंद दत्तधाम आश्रम माहुरगड यांच्या संयुक्त विद्यमाने माहुरगडावर तिसऱ्या राज्यस्तरीय जनसंवाद ग्रामीण साहित्य संमेलनाचे आयोजन येत्या ३१ डिसेंबर रोजी करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत, माजी संमेलनाध्यक्ष डॉ. राम वाघमारे, उद्घाटक ज्येष्ठ पत्रकार सरफराज दोसानी, सुप्रसिद्ध अभिनेते नामांतर कांबळे, स्वागताध्यक्ष सद्गुरू साईनाथ महाराज बितनाळकर, निमंत्रक एस. एन. पाटील, रमेश मुनेश्वर, सप्तरंगी साहित्य मंडळाचे राज्याध्यक्ष नागोराव डोंगरे, संस्थापक अध्यक्ष अनुरत्न वाघमारे यांच्या उपस्थितीत पुरस्कारचे वितरण होणार आहे. संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
No comments:
Post a Comment