सोनाजीराव इंगळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 20 December 2023

सोनाजीराव इंगळे पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त रोगनिदान शिबीराचे आयोजन

नांदेड :

येथील मगनपुरा भागातील प्रतिष्ठित नागरिक कैलासवासी सोनाजीराव इंगळे पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त मोफत भव्य रोग निदान शिबिर व रक्त तपासणी शिबिराचे आयोजन रविवार दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 11 ते सायंकाळी चार या वेळेत मगनपुरा नवा मोंढा येथे करण्यात आले आहे


या रोगनिदान व रक्त तपासणी शिबिरात विविध आरोग्य तपासणी आहे मोफत करण्यात येणार असून या शिबिराचे आयोजन फुले शाहू आंबेडकर युवा मंच व शिवगर्जना प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे तरी या शिबिराचा जास्तीत जास्त गरजूंनी लाभ घ्यावा असे आव्हान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश कार्यकारणी सदस्य स्वप्निल इंगळे पाटील यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages