जीवनदीप महाविद्यालयात "स्पंदन २०२३" संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 19 December 2023

जीवनदीप महाविद्यालयात "स्पंदन २०२३" संपन्न

कल्याण :

जीवनदिप संस्था पोई संचालित कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय गोविली येथे स्पंदन हा महोत्सव दिनांक 15 आणि 16 डिसेंबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा झाला. "स्पंदन दिल की धडकन" या थिम वर हा महोत्सव साजरा करण्यात आला या वर्षी स्पंदन महोत्सवात व्यवस्थापन विभाग ,कला विभाग , वाणिज्य विभाग,आयटी विभागाद्वारे विविध श्रेणी मधे 18 कार्यक्रमांचा समावेश होता. दोन दिवस चाललेल्या या महोत्सवात गोवेली सह कल्याण,उल्हासनगर,खर्डी,येथील महाविद्यालयांनी वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला या महोत्सवात 200 पेक्षा ही अधिक विद्यार्थ्यांनी महोत्सवाचा आनंद घेतला

महोत्सवाची सुरुवात 15 डिसेंबर ला मुंबई विद्यापीठातील लोककला विभागामधील डॉ. मोनिका ठक्कर, कोकण प्रांत संघटक मंत्री राजेंद्र मांडवे,संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे जीवनदिप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी कोरे, संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे या मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला महोत्सवात प्रामुख्याने व्यवस्थापन विभागामध्ये फॅशन शो, रांगोळी, मेहंदी यांसारख्या कार्यक्रमाचा समावेश होता. तर कला कार्यक्रमातील श्रेणीमध्ये पोस्टर मेकिंग,कॅपचरिंग, काव्य वाचन इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण केले गेले. आयटी श्रेणी मधे हटिंग व गेमिंग तसेच BG.BI यांसारख्या खेळांमध्ये विद्यार्थ्यांचा समावेश दिसुन आला. या महोत्सवात फॅशन शो, डान्स, ट्रेजर हंट यांसारख्या स्पर्धांनी सर्वाचे लक्ष वेधून घेतले. स्पंदन तरूणांच्या आकांक्षाना रुप देत विद्यार्थ्यांना धैर्यने काम करण्यास आणि मोठी स्वप्ने पाहण्यास तसेच त्यांची क्षमता पाहण्यास प्रोत्साहित करते.

हा महोत्सव विद्यार्थ्यांना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करतो असे मत  प्राचार्य डॉ. के.बी. कोरे सरांनी व्यक्त केले विद्यार्थ्यांनासाठी त्यांच्या कलागुणांचे आणि कौशल्याचे प्रदर्शन करण्यासाठी हा महोत्सव उत्कृष्ट व्यासपीठ आहे विविध महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संवाद साधण्यासाठी आणि समुदयाची भावना निर्माण करण्यासाठी तसेच त्यांना एकत्र आणण्यास महोत्सव मदत करतो असे  रविंद्र घोडविंदे सर म्हणाले तसेच या कार्यक्रमासाठी BMS IT विभागातील विभाग प्रमुख प्राध्यापक उल्हास गायकर प्राध्यापक वैभव तरे प्राध्यापक सचिन कांबळे प्राध्यापिका निकिता घोडविंदे प्राध्यापक चिन्मय गुरव व प्राध्यापिका अपर्णा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महोत्सव संपन्न झाला 16 डिसेंबर रोजी बक्षीस वितरणाने या महोत्सवाचा समारोप झाला ज्या मध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेत DJ च्या तालावर नृत्य केले.


No comments:

Post a Comment

Pages