जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करा: समाधान जाधव यांची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 3 January 2024

जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या निकृष्ट दर्जाच्या कामांची चौकशी करा: समाधान जाधव यांची मागणी

किनवट,ता.३(बातमीदार):माहूर-किनवट तालुक्यात जलजीवन मिशन अंतर्गत मंजुर नळयोजनेची कामे सुमार दर्जात करुन खेडेगावातील सी.सी. रस्ते जेसीबी मशिनच्या सहाय्यने खोदुन विद्रुप केले जात आहेत. शासनाकडून अतिरिक्त निधी लाटण्यासाठी पाणी पुरवठा अभियंत्यानी कंत्राटदाराच्या मर्जी प्रमाणे अवास्तव अंदाज पत्रक तयार केले आहे. अशा अभियंता व कंत्राटदारा विरुध्द व्यापक चौकशी करुन प्रचलीत तरतुदी नुसार प्रभावी कारवाई करण्यात यावी,अशी मागणी समाधान बालचंद जाधव माजी उपाध्यक्ष तथा सभापती - बांधकाम व अर्थ समिती जिल्हा परिषद, नांदेड यांनी एका निवेदनाद्वारे प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे नुकतीच केली आहे.

    निवेदनात नमुद केले आहे की, माहूर- किनवट तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत नळ योजनेची कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. यामुळे ग्रामीण, दुर्गम व डोंगराळ भागातील पाणी टंचाई निवारणार्थ दिलासा मिळणार आहे. परंतु, या योजनेची अंमलबजावणी करतांना पाईप लाईन टाकण्यासाठी ग्रामीण भागातील सी.सी. रस्त्यावर जेसीबी मशिनच्या सहाय्याने अनावश्यक खड्डे खोदून ते विद्रुप करण्यात येत आहेत. शिवाय सदर पाईप लाईन टाकलेल्या नाल्या मातीनेच बुजविल्या जात असल्यामुळे आगामी पावसाळ्यात खेड्या गावात या रस्त्यावरून चालता येणे सुध्दा कठीन होणारआहे.तसेच होत असलेल्या पाणी पुरवठा योजना कामांचा दर्जा देखील निकृष्ट आहे. जलजीवन मिशन योजने अंतर्गत माहूर तालुक्यात ५१ गावामध्ये कामे मंजूर असून ४८ गावामध्ये प्रत्यक्षात कामाला सुरुवात झाली आहे, तर किनवट मध्ये ११४ गावात या योजने अंतर्गत काम सुरु आहे. या संपूर्ण कामाच्या अंदाजपत्रकांचे निरीक्षक केले असता संबंधीत अभियंत्यांनी पाईप लाईन कामाची व्यप्ती अनावश्यक रित्या वाढविली असून त्यात केवळ शासनाकडुन वाढीव निधी लाटण्यासाठी तांत्रीक बाबिचा समावेश करण्यात आला आहे व अवास्तव अंदाजपत्रकात रक्कम वाढवली आहे.

  या गंभीर प्रकरणाची आपण व्यक्तीशः दखल घेऊन संबंधीत अभियंता आणि कंत्राटदारा विरुध्द प्रचलीत तरतुदी नुसार प्रभावी कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.


No comments:

Post a Comment

Pages