धम्म परिषदेला जत्रेचे स्वरूप येऊ नये: आमदार जिग्नेश मेवाणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 3 January 2024

धम्म परिषदेला जत्रेचे स्वरूप येऊ नये: आमदार जिग्नेश मेवाणी


किनवट,(बातमीदार):शहरात मागिल अनेक वर्षांपासून धम्म परिषद होत आहेत.यावर्षि पुढील महिन्यात ११ व १२फेब्रुवारी रोजी होणाऱ्या धम्म परिषदेला आपण उपस्थित राहणार आहोत,होणारी ही धम्म परिषद केवळ जत्रा न ठरता त्यामधून एक वेगळा संदेश धम्म बांधवापर्यंत जावा ,या उद्देशाने आपण संयोजन समितीच्या सदस्यांशी चर्चा करण्यासाठी येथे आलो आहे,असे प्रतिपादन आमदार जिग्नेश मेवाणी (गुजरात )यांनी केले.

     धम्म परिषदेच्या कार्यकर्त्यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी ते येथे नुकतेच आले होते.यानिमित्ताने पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

त्यांच्या समवेत केशव वाघमारे व सुमेध हे कार्यकर्ते ही उपस्थित होते.

     परिषद झाल्यावरही परिषदेतून काही चांगल्या स्वरुपाचे काम उभे व्हावे व या कामांशी आपण सतत संपर्कात रहावे ,असा आपला उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

   यावेळी धम्म परिषदेचे कार्यकर्ते राहुल कापसे,अभय नगराळे,प्रज्ञानंद खडसे,अरुण आळणे,देवकांत वजारे, राहुल सर्पे यांच्या सह  काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Pages