पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 2 January 2024

पेट्रोल व डिझेलचा मुबलक साठा अफवांवर विश्वास ठेवू नका - जिल्हाधिकारी अभिजीत राऊत


नांदेड  दि. 2 : ट्रक चालकांनी घेतलेली भूमिका लक्षात घेऊन डिझेल व पेट्रोलचा तुटवडा निर्माण होईल या भितीपोटीने काही वाहनचालकात संम्रभ दिसून येत आहे. अनेक वाहनचालक आवश्यकतेपेक्षा जास्त पेट्रोल व डिझेल भरतांना दिसून येत आहे. याबाबत पेट्रोलपंप चालकांकडून आढावा घेतला असून कोणत्याही प्रकारचा तुटवडा जिल्ह्यात नाही, हे स्पष्ट झाले आहे. 


जिल्ह्यातील सर्व वाहनधारकांनी अफवांवर विश्वास न ठेवता आपल्या गरजेएवढेच नेहमीप्रमाणे पेट्रोल व डिझेल घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. 


जिल्ह्यात कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यादृष्टिने जिल्हा प्रशासन व पोलीस विभाग दक्ष आहे. नागरिकांनी सहकार्य करावे, असेही त्यांनी सांगितले.


No comments:

Post a Comment

Pages