पुणे :
पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या गौरवार्थ प्रकाशित मिलिंद दिनदर्शिकेचे प्रकाशन काल भीमाकोरेगाव येथे रिपब्लिकन सरसेनानी मा.आनंदराज आंबेडकर साहेब, भारतीय बौद्ध महासभेचे कार्याध्यक्ष आद.भीमराव आंबेडकर साहेब, आदरणीय मनिषाताई आंबेडकर, अमन आंबेडकर साहेब यांच्या हस्ते पार पडले तर संजीव बोधनकर, काकासाहेब खंबाळकर , विवेक भाऊ बनसोडे, युवराज दादा बनसोडे, विद्याभूषन डॉ.प्रशांत पगारे, आशिष गाडे,मनोज गायकवाड, राजेश गायकवाड, इंजी. आकाश कांबळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
आज पासून मिलिंद दिनदर्शिका ही सगळीकडे विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.
सुटसुटीत व ऐतहासिक माहितीने संपन्न आकर्षक दिनांक पृष्ठ, मागील पृष्ठावरील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विस्तृत परिचय पत्र (माझा भीमराया), पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या शाळा महाविद्यालये यांची परिपूर्ण माहिती, बौद्ध धम्माच्या पौर्णिमा, विविध महत्त्वाच्या घडामोडी घटना यांची इत्यंभूत माहिती, मिलिंद महाविद्यालयाची पहिली विद्यार्थिनी, मिलिंद हस्तलिखित पक्षिकावरील विशेष लेख, लेणी संशोधक अतुल भोसेकर यांचा बौद्ध लेण्यांवरील संशोधनपर लेख, सुर्यपुत्र यशवंत आंबेडकर यांचा जीवनपट, पीपल्स एज्युकेशन सोसायटी बचाव आंदोलनाची भूमिका, नामांतर लढ्याचा घटनाक्रम, बुद्ध धम्म भारतीय संविधान यांची प्रश्नोत्तरे स्वरूपात माहिती,मिलिंद महाविद्यालयाच्या इमारतीची वास्तू कला, विद्यार्थ्यांसाठी बाबासाहेबांची महत्वपूर्ण भाषणे अशी बहुमूल्य माहिती या दिनदर्शिकेत वाचकांना वाचायला मिळणार आहे.
मिलिंद दिनदर्शिका ही मिलिंद प्रकाशन, औरंगाबाद, व मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या सहकार्याने प्रकाशित करण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment