जीवनदीप महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 23 January 2024

जीवनदीप महाविद्यालयात संशोधन पद्धतीवर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न

कल्याण :

जीवनदीप शैक्षणिक संस्था ही ग्रामीण, आदिवासी भागात उच्च शिक्षणाची संधी निर्माण करून देणारी शैक्षणिक संस्था आहे. श्री रविंद्र नारायण घोडविंदे यांनी या शैक्षणिक संस्थेची उभारणी केली असून कल्याण मुरबाड, शहापूर या तालुक्यात संस्थेची शाळा, कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालये, विधी महाविद्यालये ज्ञानदानाचे कार्य करीत आहेत. जीवनदीप महाविद्यालय गोवेली हे सन २००४ मध्ये सुरू झालेले कल्याण ग्रामीण भागातील नॅक मूल्यांकन प्राप्त दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण देणारे महाविद्यालय आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांना कला, क्रीडा व सांस्कृतिक आदी सर्वच क्षेत्रातील संधी या महाविद्यालयाने उपलब्ध करून दिली आहे. संशोधनाला चालना देणारे अनेक राष्ट्रीय, विद्यापीठ स्तरीय चर्चासत्रे, कार्यशाळा, परिषदांचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाने केले आहे.
       याचाच एक भाग म्हणून या वर्षी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालययात विज्ञान शाखेतर्फे संशोधन पध्दतीवर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.सदर कार्यक्रमासाठी डॉ.नंदकिशोर चंदन (सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई )यांचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग प्रमुख  प्रा. प्रियंका पाटील यांनी केले सदर कार्यक्रमासाठी परिसरातील  जीवनदीप महाविद्यालय,बी एन एन महाविद्यालय, अग्रवाल महाविद्यालय, महाराष्ट्र महाविद्यालय, इस्माइल युसुफ महाविद्यालय,वझे महाविद्यालय असे विविध महाविद्यालयातील  १२० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सुप्रिया शिंदे यांनी केले तर आभार प्रा. कल्पेश आहेर यांनी मानले यावेळी कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष रविंद्र घोडविंदे,प्राचार्य डॉ. के.बी कोरे,संचालक प्रशांत घोडविंदे, उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,विभागातील  प्राध्यापक ,प्रा.अविनाश गायकर ,प्रा. रुची शुक्ला ,प्रा. योगेश त्रिभुवन,डॉ.रुपाली मगर, प्रा. मिलिंद टिंगळे यांची उपस्थिती तसेच प्रा. विजय सोनार ,प्रा. मोहनिष देशमुख व महाविद्यालयातील प्राध्यापक , कर्मचारी विद्यार्थ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment

Pages