संभाजीनगर :
75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने 'प्रजासत्ताक भारत चिरायू होवो' चा संदेश देण्यासाठी मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन व पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या च्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने बौद्ध लेणी येथे दि.२८ जाने रोजी सकाळी ०७ ते ११ या वेळेत 'रिपब्लिक मॉर्निंग ' या प्रबोधनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
समूह नृत्य व जल्लोषमय भीमगीतांचे देखील या वेळी सादरीकरण होणार आहे.
झुंड फेम रॅपर विपीन तातड हा काय की लोकशाही ? मेरी समस्या ह्या लोकप्रिय रॅप चे सादरीकरण करतील तर शाहीर मेघानंद जाधव, डॉ.किशोर वाघ हे भीमगीतांच्या माध्यमातून प्रबोधन करणार आहेत.
बॉबी खरात हा घटम (मटका) वादन करून भीमगीत सादर करतील, सेक्सोफोन, बासरी, बॅंजो, पर्ण वादन यांच्या साह्याने भीमगीतांची आगळीवेगळी मेजवानी नागरिकांना मिळणार आहे.
मतदार जागृतीपर गीतांचे सादरीकरण यावेळी करणार आहेत.
No comments:
Post a Comment