किनवट : इस्लापूर व राजगड(ता.किनवट) येथील प्रा.आ.केंद्रामध्य वेद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांचे निवासस्थान कोणालाही हस्तगत न करता नियमबाहय पदधतीने घरभाडे उचलत आहेत याची सखोल चौकशी करून दोषीविरुध्द कडक कायदेशिर कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते राज माहूरकर यांनी निवेदनाद्वारे मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी, जि.प.नांदेड यांच्याकडे नुकतीच केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की,प्रा. आ.केंद्र राजगड व प्रा.आ.केंद्र इस्लापूर येथिल जनमाहिती अधिकारी यांच्याकडून सन २०२० ते आजपर्यंत निवासस्थाना बाबतची माहिती माहीती अधिकारात मागीतली होती.परंतु, तेथिल जनमाहिती अधिकारी यांनी माहिती अधिकारात मागणी केलेली माहिती पूर्ण न देता अपूर्ण दिलेली आहे.
माहिती अधिकारात प्राप्त माहितीचे अवलोकन केले असता प्रा. आ.केंद्र राजगड येथील वैद्यकीय अधिकारी यांचे एक निवासस्थान आहे. त्या निवासस्थानामध्ये सर्वच वैद्यकीय अधिकारी राहत असतात असे प्राप्त माहितीवरून दिसून येते,तर
प्रा.आ.केंद्र इस्लापूर येथील वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी निवासस्थानाची संख्या दोन असून यामध्ये एका निवासस्थानामध्ये दोन वैद्यकीय अधिकारी राहतात व दुस-या निवासस्थनामध्ये परीचर राहत असल्याचे दिसून येते.
शासनाची दिशाभूल करून घरभाडे उचलत आहेत या प्रकरणाची मुख्यकार्यकारी अधिकारी व जिल्हा आरोग्य अधिकारी जि.प.नांदेड यांनी आपल्या स्तरावर सखोल चौकशी करून वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचारी यांच्यावर दंडात्मक कार्यवाही करून आवश्यक ती फौजदारी स्वरूपाची कायदेशिर कार्यवाही करावी,असे निवेदनात म्हटले आहे.निवेदनाच्या प्रति जिल्हाधिकारी, गटविकास अधिकारी व तालुका आरोग्य अधिकारी, किनवट यांना पाठविण्यात आल्या आहेत.
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संबंधित वैद्यकीय अधिका-यांशि संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
No comments:
Post a Comment