फार्मासिस्ट नसलेल्या मेडिकल चालकांवर कडक कारवाई करा:ग्राहक पंचायतीची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 12 January 2024

फार्मासिस्ट नसलेल्या मेडिकल चालकांवर कडक कारवाई करा:ग्राहक पंचायतीची मागणी

किनवट : तालुक्यात  ईस्लापूर, बोधडी, कोठारी(चि.), गोकुंदा, किनवट,सारखनी,उमरी(बा.)व मांडवी येथे एकूण १६६  मेडीकल आहेत.या १६६ पैकी अनेक मेडिकल स्टोअर्सवर फार्मासिस्ट नाहीत.ते विना फार्मासिस्ट सुरू आहेत,अशा मेडिकल चालकांवर अन्न आणि औषध प्रशासनाच्या वतीने कडक कारवाई करण्यात यावी,अशी मागणी किनवट तालुका ग्राहक पंचायत या नोंदणीकृत स्वंयसेवी ग्राहक संघटनेचे अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे यांनी नुकतीच केली आहे. 

काय आहेत नियम ?

   नियमांनुसार जर मेडिकल स्टोअर चालक एखाद्या फार्मासिस्टला तेथून काढून टाकल्यास नवीन फार्मासिस्टची माहिती त्याचवेळी देणे बंधनकारक आहे. जर त्याने माहिती दिली नाही तर नियमानुसार त्याचा व्यवसाय बंद करावा लागेल. याशिवाय फार्मासिस्टच्या उपस्थितीत शेवटचे औषध विकले गेले आणि त्या औषधाच्या विक्रीची पावतीही प्रतिज्ञापत्राद्वारे द्यावी लागेल. 

नियमांकडे दुर्लक्ष 

   अन्न आणि औषध प्रशासनाचे औषध निरीक्षक या बाबींकडे लक्ष देत नसल्याचा आरोप किनवट तालुका ग्राहक पंचायतीचे  अध्यक्ष अॅड.मिलिंद सर्पे यांनी केला आहे. तसेच वैद्यकीय संचालक  या नियमांकडे दुर्लक्ष करत असल्यास ते तपासतही नाहीत, यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे.ग्राहकांना औषधी घेतल्यावर पावती सुध्दा देण्यात येत नाही.तसेच फार्मासिस्ट नसल्यामुळे योग्य औषध ही ग्राहकांना मिळत नाही.


No comments:

Post a Comment

Pages