पैनगंगातिरी: जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे स्वकथन! -प्रो.डॉ.युवराज मानकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 13 January 2024

पैनगंगातिरी: जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे स्वकथन! -प्रो.डॉ.युवराज मानकर


किनवट :             समाज संस्कृती सापेक्षता आणि निरपेक्षता ही 'स्व'ला 'स्व 'च्या अस्तित्वाची जाणीव करून देते.या जाणिवेतून 'स्व' अस्वस्थ होतो.त्याची अस्वस्थता त्याला अनुभव, ज्ञान आणि कौशल्याकडे मार्गक्रमण करायला लावते.लेखक सखाराम घुले हे असेच स्वतःचा शोध घेतात असे  'पैनगंगातिरी' या स्वकथन प्रकाशन प्रसंगी  प्रो. डॉ.युवराज मानकर यांनी प्रतिपादन केले.गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहातदि.१०डिसेंबर २०२३रोजी आयोजित सेवानिवृत्त मुख्याध्यापक सखाराम घुले लिखित 'पैनगंगातिरी'या स्वकथनाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके होते. पुढे बोलताना प्रो. डॉ. मानकर म्हणाले की लेखक सखाराम घुले यांनी त्यांच्या क्रिया प्रतिक्रियेवर उभ्या असलेल्या अनुभवावरून ते समाज व संस्कृतीत  कसे घडले याचे दर्शन सिद्ध केले.त्यांच्या ह्या ऐतिहासिक जीवनानुभवाचे वर्तमानातील जगण्याच्या पुनर्रचनेची मांडणी करणारे ' पैनगंगातिरी' हे स्वकथन आहे.असे ही ते म्हणाले . प्रकाशन प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते.प्रारंभी वामनदादा कर्डक संगीत अकादमी चे प्राचार्य सुरेश पाटील यांच्या संचानी प्रबोधन गीते सादर केली.प्रतिमा पुजनानंतर लेखक सखाराम घुले यांनी त्यांच्या पैनगंगातिरी या स्वकथनाच्या निर्मितीची संकल्पना आपल्या प्रास्ताविकात मांडली. या प्रसंगी प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ.आनंद इंजेगावकर यांनी या स्वकथनाचे सविस्तर विश्लेषण केले.तर माजी नगराध्यक्ष प्राचार्य मोहन मोरे,माहुर येथील सुतगीरणीचे मुख्य प्रवर्तक प्रकाश गायकवाड यांनी लेखकाच्या जीवनसंघर्षातील आठवणींना उजाळा दिला.प्रा. डॉ.पंजाब शेरे यांनी बीजभाषण केले.अध्यक्षिय समारोपात अभियंता प्रशांत ठमके यांनी पैनगंगातिरी या स्वकथनाचे कौतुक करत अभिनंदन केले.याप्रसंगी सावित्रीबाई फुले विचारमंच च्या अध्यक्षा प्राचार्या शुभांगी ताई ठमके,प्रकाशिका स्मिता कानिंदे, वंदना घुले यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले तर महेंद्र नरवाडे यांनी आभार मानले.यावेळी उपस्थित किनवट व माहुर तालुक्यातील साहित्यप्रेमीच्या वतीने लेखक सखाराम घुलें व त्यांच्या सुविद्य पत्नी वंदना घुले यांचा सत्कार करण्यात आला तसेच निवेदक मीडिया चे प्रकाशक उत्तम कानिंदे व प्रकशिका स्मिता उत्तम कानिंदे यांचा लेखकाच्या वतीने सत्कार करण्यात आला.कार्यक्रम यशस्वीतेसाठी घुले परिवारातील राजकुमार,अश्वत ,सुदिन,धम्मरत्न,संघरत्न घुले यांच्यसह सर्व सदस्यांनी पुढाकार घेतला.

No comments:

Post a Comment

Pages