दिव्यांगांचा निधी ग्रामपंचायतींनी वाटप करावा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंटची मागणी, अन्यथा आंदोलन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 9 January 2024

दिव्यांगांचा निधी ग्रामपंचायतींनी वाटप करावा सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंटची मागणी, अन्यथा आंदोलन


किनवट,दि.९ : ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो; परंतु, काही ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी वाटप झाला नाही, याबाबत सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट या  संघटनेच्या  वतीने किनवट पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांना दिव्यांगांच्या विविध समस्यांबाबत नुकतेच निवेदन देण्यात आले.

  निवेदनात दिव्यांग बांधवांच्या समस्यांचे निराकरण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. ग्रामपंचायत अंतर्गत ग्रामपंचायतीच्या वार्षिक उत्पन्नाच्या पाच टक्के निधी हा दिव्यांग बांधवांना वाटप करण्यात येतो; परंतु, काही ग्रामपंचायतींकडून पाच टक्के निधी वाटप झाला नाही, तर काही ठिकाणी ग्रामसेवकांकडे वार्षिक उत्पन्नाची विचारणा केली असता, समाधानकारक माहिती मिळाली नाही, तसेच वार्षिक उत्पन्नाच्या कोणता कागदोपत्री लेखाजोखा दाखविण्यात आला नाही. ज्या ग्रामसेवकांनी निधी खर्च केला नाही अशा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्यात यावी.

जर ३० दिवसांच्या आत प्रत्येक ग्रामपंचायतींनी पाच टक्के निधी खर्च केला नाही, तर सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंट या  संघटने कडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, तसेच शासनाच्या घरकुल योजनेत दिव्यांग बांधवांना समाविष्ट करण्यात यावे व दिव्यांगांसाठीच्या विविध योजनांचे फलक ग्रामपंचायतीत दर्शनी भागात लावण्यात यावे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

  || काही ग्रामपंचायतचे उत्पन्न  लाखामध्ये असूनसुद्धा ग्रामसेवकांकडून ग्रामपंचायतीचे उत्पन्न तोंडी कमी सांगण्यात येत आहे. त्यामुळे दिव्यांगांना त्यांच्या हक्काचा निधी प्राप्त होत नाहीय. बंद लिफाफ्यात तीनशे, पाचशे ते हजार रुपयांपर्यंत वाटप करून दिव्यांगांची चेष्टा करण्यात येत आहे.||


- भगवान मारपवार, प्रहार दिव्यांग क्रांती संघटना, किनवट तालुकाध्यक्ष


No comments:

Post a Comment

Pages