बुद्ध तत्वज्ञान जगाला युद्धापासून वाचवू शकते. भदंत नागसेन बोधी ; विश्व धम्मध्वज दिवस जल्लोषात साजरा - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 8 January 2024

बुद्ध तत्वज्ञान जगाला युद्धापासून वाचवू शकते. भदंत नागसेन बोधी ; विश्व धम्मध्वज दिवस जल्लोषात साजरा


संभाजीनगर :

जगातील बुद्धांच्या एकतेचे प्रतीक बनलेल्या बौद्ध धम्म ध्वजाच्या गौरव दिनानिमित्त मिलिंद नागसेनवन स्टुडंन्ट्स वेल्फेअर असोसिएशन च्या वतीने आज डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट ते बौद्ध लेणी अश्या धम्मध्वज गौरव रॅली चे आयोजन करण्यात आले होते.


रॅली मधील शंभर फूट लांब धम्मध्वजाने यावेळी लक्ष वेधून घेतले अत्यंत उत्साहात बौद्ध लेणी येथे धम्म रॅली चा समारोप करण्यात आला.

विद्यापीठातील डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णकृती पुतळ्याजवळ जल्लोषात 'जग में बुद्ध का नाम है, यही भारत ही शान है, धम्मध्वज चिरायू होवो, बुद्ध धम्म की एक ही पुकार, बाबासाहेब का सपना करो साकार अश्या गगनभेदी घोषणा देण्यात आल्या तर आकाशात पंचरंगी फुगे सोडून धम्म ध्वज चिरायू होवो यासाठी भिख्खू संघाने मंगल कामना केली.


यावेळी भदंत नागसेन बोधी यांनी सर्वांना सामूहिक रित्या त्रिसरण पंचशील दिले.

यावेळी भदंत नागसेन बोधी यांनी आज जग युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहे, धर्म जातीच्या नावाने द्वेष पसरवला जात आहे त्यामुळे जगातील अनेक देश इतर देशांना शत्रू समजून बसले असतांना बुद्ध तत्वज्ञान जगाला शांतीचा मार्ग दाखवत असल्याने जगाला वाचविण्याची जबाबदारी बौद्धांवर आली असल्याने द्वेषाच्या वातावरणात बुद्धविचारांची पेरणी धम्मानुयायांनी करावी असे प्रतिपादन केले.

धम्म रॅली मध्ये डॉ.प्रमोद दुथडे फाउंडेशन द्वारे आयोजित श्रामनेर शिबिरातील 25 श्रामनेर सहभागी झाले होते.

भदंत नागसेन बोधी, डॉ.देवानंद वानखेडे, आयोजक सचिन निकम, डॉ.प्रमोद दुथडे, शाहिर मेघानंद जाधव,चंद्रकांत रुपेकर, मिलिंद बनसोडे प्रा.देवानंद पवार, डॉ.किशोर सूर्यवंशी, डॉ.अविनाश सोनवणे, अमित घनगाव, राहुल वडमारे, राष्ट्रपाल गवई, प्रा.प्रबोधन बनसोडे, अविनाश कांबळे,कुणाल भालेराव, विकास हिवराळे, अतुल कांबळे, विकास रोडे,तुषार अवचार, ब्रिजेश इंगळे, आकाश पंडित, सिद्धार्थ मोरे, राज कांबळे, डॉ.करूणा वाघमारे,सुमित सुरडकर, रुपराव खंदारे, विश्वजित वाघमारे, सिद्धार्थ दिवेकर, नयन पवार, विशाल वाघ, चेतन गाडे, सिद्धांत भालेराव, सुयोग बनसोडे, हर्ष पवार, भीमराज वाघमारे, प्रसेनजीत गायकवाड,सिद्धार्थ गायकवाड, प्रेम किरते, शुभम उबाळे,प्रवीण गायकवाड,  आदींसह मोठ्या संख्येने उपासकांची उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment

Pages