संभाजीनगर :
दि.3 शनिवार रोजी सकाळच्या सुमारास हर्सुल येथील सुभेदार रामजी आंबेडकरनगर येथे अनेक वर्षा पासुन असलेल्या भीमशक्ति बौद्ध विहारामधील बुद्ध मूर्तिची काही अज्ञात समाजकंटका कडुन मोड तोड करित विटंबना झाल्याचे वसाहतीतील नागरिकांच्या नजरेस आले, काही जागरूक नागरिकांनी संबंधित पोलीस स्टेशनमधील फोनद्वारे माहिती दिली, ही घटना सोशल मीडियाच्या माध्यमातून समजल्या नंतर शहरात संतापाची लाट पसरली होती, आंबेडकरवादी बहुजन विकास समितीचे अध्यक्ष दिपक निकाळजे, डॉ.दिपक खिल्लारे,आनंद कस्तुरे व पोलीस निरीक्षक गौतम पातारे यांनी घटनास्थळी भेट देऊन बौद्ध विहारामध्ये बौद्धवंदना घेतली व नागरिकांना शांततेचे आवाहन केले,आंबेडकरी चळवळीच्या अनेक जागरूक भिमसैनिकांकडुनही शांततेचे आवाहन करण्यात आले , तसेच सदरील प्रकरणामधे तात्काळ स्थानिक नागरिकांच्या मदतीने तक्रार दाखल करण्यात आली आहे, अनेक वर्षापूर्वीचे हे बौद्ध विहार असुन गेल्या अनेक वर्षा पासुन सदर वसाहतीतील नागरिक हे सकाळ संध्याकाळ याठिकाणी बौद्ध वंदनेसाठी जमतात हा आमच्या समाज अस्मितेचा विषय असुन अनेक तात्काळ या घटनेस जबाबदार आरोपींना अटक करुन कठोर शासन करण्यात यावे,अंधाराचा फायदा घेत हे कृत्य करण्यात आल्याने मनपा कडून या वसाहतीमध्ये स्ट्रीट लाईट व CCTV कैमरे बसविन्यात यावेत, या वसाहती मध्ये सुरु असलेले अवैध्य धंधे तात्काळ बंद करण्यात यावेत अशा विविध मागण्या करीत वसाहतीतील नागरिकांना सोबत घेवून मा.पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आले, शहराचे पोलीस आयुक्त मा.मनोजजी लोहीया साहेब यांची भेट घेऊन सदरिल प्रकरणात चर्चा करण्यात आली, याबाबत तात्काळ वरिष्ठ पोलीस अधिकारी हे याप्रकरणात लक्ष घालुन आहेत लवकरच आरोपींना अटक करुण या समाज संकटावर कडक कायदेशिर कार्यवाही करण्यात येईल असा शब्द मा. मनोज लोहिया यांनी आलेल्या शिष्टमंडळाला दिला व शहरांमध्ये शांतता राखण्याचे आवाहन केले यावेळी शिष्टमंडळात दिपक निकाळजे, आनंद कस्तुरे, डॉ.दिपक खिल्लारे, सचिन जोगदंड,पवन पवार,किशोर ससाणे, विजय वाहूळ,स्वप्निल शिरसाठ,अजय देहाडे,प्रमोद आहिरे,रवि वाघ,राम पाखरे, गौरव जाधव, संतोष चव्हाण, कांताबाई रघुनाथ, जयश्री थोरात, कमल नरवडे, हिराबाई खरात, लताबाई वाहुळ, गोदाबाई वाकळे, चंद्रकांत दाभाडे, नितिन निकाळजे, अविनाश डोंगरे,बुध्दभुषण निकाळजे,दिपक गवळी, नितीन भगत व मोठ्या संख्येने आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते हजर होते .
No comments:
Post a Comment