डोणवाडा येथे आदर्श शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 21 February 2024

डोणवाडा येथे आदर्श शिवजन्मोत्सव सोहळा संपन्न



वसमत :
दरवर्षीप्रमाणे याही वर्षी डोणवाडा या ठिकाणी अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात आला. यामध्ये सकाळी प्राचार्य नरहर कुरुंदकर लिखित "छत्रपती शिवाजी महाराज जीवन - रहस्य" या शिवचरित्राचे सामूहिक वाचन घेण्यात आले.  सायंकाळी चार वाजता "जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे" आयोजन करण्यात आले होते. यामध्ये परिसरातील एकूण पन्नास विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला 
विजेत्या स्पर्धकांची नावे
प्राथमिक गट
प्रांजल प्रमोद देवरे व माहेश्वरी ज्ञानेश्वर नवघरे उत्तेजनार्थ.
तृतीय पारितोषिक समीक्षा मारुती दळवी, द्वितीय - प्रज्ञा उत्तमराव गायकवाड व प्रथम- पारितोषिक सदिच्छा संतोष पत्रे हिने पटकाविले. माध्यमिक गटात काजल केशव जगताप- उत्तेजनार्थ, सुदेशना बाजीराव साळुंखे- तृतीय विश्रांती अंकुश देशमुख - द्वितीय तर पायल गजानन डोईजड- प्रथम पारितोषिक पटकावले. आणि विशेष या सर्व विजेत्यांना बक्षीस सुद्धा गावातील ज्येष्ठ महिलांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


 तब्बल दहा हजाराची बक्षीसे आणि उत्तेजनार्थ शिवचरित्र म्हणून बक्षीस देण्यात आले. तसेच गावातील जुन्या यशस्वी नागरिकांचा "मायभूमीतील दीपस्तंभ" नावाचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व गावकरी मंडळींनी आपले सहकार्य दिले आणि विशेषतः शिवजन्मोत्सव समितीने या कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न  केले.

No comments:

Post a Comment

Pages