पाण्याच्या शोधात प्राण्यांची भटकंती: उपाययोजना करण्याची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 23 March 2024

पाण्याच्या शोधात प्राण्यांची भटकंती: उपाययोजना करण्याची मागणीकिनवट,ता.२३ : तालुक्यातील जंगल शिवारात असलेले

नैसर्गिक जलस्रोत कोरडे झाले असून कृत्रिम पाण्याचे हौद तयार न केल्याने पाण्याच्या शोधात वन्यजीव प्राणी जंगलाबाहेर पडत आहेत. 

    काही दिवसांपूर्वी मांडवी परिसरात अशाच तहानलेल्या रोही या प्राण्याचा विहीरीत पडून मृत्यू झाला. नैसर्गिक साधन संपत्तीने समृद्ध असलेल्या तालुक्यातील जंगल शिवारात वन्यजीव प्राण्यांचा मुक्त वावर आहे. पाणी मिळावे म्हणून वन्यजीव प्राणी हे पाण्यासाठी इकडे तिकडे भटकंती करीत आहेत. वन्यजीव प्राण्यांचा संभाव्य पाणी बळी होऊ नये म्हणून उपाययोजनेची मागणी होत आहे.


No comments:

Post a Comment

Pages