भीमजयंतीच्या जल्लोषात नागसेन फेस्टिव्हलची पर्वणी ; व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, भीमगित- रॅप, नृत्य- भारत नाट्यमसह भरगच्च कार्यक्रमाचे २९, ३०,३१ मार्च रोजी नागसेनवनात आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 23 March 2024

भीमजयंतीच्या जल्लोषात नागसेन फेस्टिव्हलची पर्वणी ; व्याख्यान, परिसंवाद, कवी संमेलन, भीमगित- रॅप, नृत्य- भारत नाट्यमसह भरगच्च कार्यक्रमाचे २९, ३०,३१ मार्च रोजी नागसेनवनात आयोजन

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 133 व्या जयंतीनिमित्त नागसेन फेस्टिव्हल चे लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय, नागसेनवन परिसरात आयोजन केले असून  त्या अंतर्गत भरगच्च सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानीच आंबेडकरी अनुयायांना मिळणार आहे महोत्सवाचे हे ८ वे वर्ष आहे.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी माजी विद्यार्थ्यांच्या सहभागातून अनेक दर्जेदार उपक्रम राबविणार असल्याचे संयोजन समितीच्या वतीने मुख्य निमंत्रक सचिन निकम यांनी सांगितले आहे.

शुक्रवार दि.२९ रोजी राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते सायं ६:३० वाजता या फेस्टिव्हल चे उदघाटक होईल.

त्यानंतर पटकथा लेखक, साहित्यिक तथा पत्रकार संजय पवार यांचे 'लोकशाही आणि आंबेडकरी समाज' या विषयावर  व्याख्यान होईल तर स्वागतपर उत्कर्षा बोरीकर यांचे भीमगीतावरील भरत नाट्यम चे सादरीकरण होईल.

दि.३० रोजी नागसेनवनातील आजी माजी विद्यार्थी व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्यासाठी लुम्बिनी उद्यान येथे ११ ते ३ यावेळेस  शहरातील तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत मोफत सुपरस्पेशालिटी आरोग्य तपासणी शिबीर , मोफत नेत्र तपासणी व सवलतीच्या दरात तपासण्या व चाचण्या करण्यात येणार आहेत डॉ.आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचा त्यात सहभाग असणार आहे.


सायंकाळी ६ ते ७:४५ या वेळेत दिल्ली येथील जेएनयू विद्यापीठात विद्यार्थी चळवळीचे नेतृत्व केलेले आईस्का चे नेते डॉ.राहुल सोनपिंपळे, फिन्द्री या बहुचर्चित कादंबरी च्या लेखिका डॉ.सुनीता बोर्डे यांचे व्याख्यान होईल तर सायं ८ ते १० या वेळेत नागसेनवनातील माजी विद्यार्थी कवींचे संमेलन होईल त्यात डॉ.उत्तम अंभोरे, प्रा.युवराज धसवाडीकर, प्रा.भास्कर गायकवाड, ऍड.हिरामण मोरे, प्रा.देवानंद पवार, प्रा.एकनाथ खिल्लारे, पद्माकर तामगाडगे, यांचा सहभाग असणार आहे तर जेष्ठ कवी डॉ.महेंद्र भवरे हे अध्यक्षस्थानी असतील.


रविवार दि.३१ मार्च रोजी महोत्सवाच्या समारोपाला पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत मिलिंद नागसेनवन आजी माजी विद्यार्थी संमेलन पार पडणार असून त्याअंतर्गत सिडनहॅम कॉलेज चे माजी प्राचार्य व्ही बी तायडे, ऍड.जयमंगल धनराज, महेंद्र भवरे, डॉ.युवराज धसवाडीकर, डॉ.प्रियानंद आगळे आदी माजी विद्यार्थी यांच्या परिसंवादातुन पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विकासाबाबत चर्चा घडवून आणली जाणार आहे.

पीईएस अभियांत्रिकी चे माजी विद्यार्थी तथा पोलीस उपायुक्त नितीन बगाटे यांच्या हस्ते या संमेलनाचे उदघाटन होईल.

पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या माजी विद्यार्थ्यास देण्यात येणाऱ्या नागसेन गौरव पुरस्कार जेष्ठ साहित्यिक डॉ.यशवंत मनोहर याना सन्मानपूर्वक प्रदान केला जाणार आहे.

सायंकाळी ८ ते १० वेळेत समारोपाच्या प्रसंगी भीमशाहिर मेघानंद जाधव, डॉ.किशोर वाघ, रॅपर विपीन तातड, मंगेश इंगोले यांच्या भीमगीतांच्या सादरीकरणाने फेस्टिव्हल चा समारोप होईल.71 ब्रदर ग्रुप चे भीमगितावर नृत्य सादरीकरण होईल.

महोत्सवाच्या तीनही दिवस विविध क्षेत्रातील मान्यवरांना मिलिंद सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल तसेच आजी माजी विद्यार्थ्यांचे भीमगीतावरील समूह नृत्य, पेंटींग चे प्रात्यक्षिक व इतर कला प्रकाराचे सादरीकरण होणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages