आजपासून रंगणार नागसेन फेस्टिव्हल पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते उद्घाटन ; पटकथा, लेखक संजय पवार यांचे विशेष व्याख्यान - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 28 March 2024

आजपासून रंगणार नागसेन फेस्टिव्हल पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते उद्घाटन ; पटकथा, लेखक संजय पवार यांचे विशेष व्याख्यान


छत्रपती संभाजीनगर: महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या आजी- माजी विद्यार्थ्यांच्या वतीने २९ ते ३१ मार्च दरम्यान नागसेनवन परिसरातील लुम्बिनी उद्यान, मिलिंद महाविद्यालय येथे नागसेन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले आहे. २९ मार्चला सायंकाळी ६:३० वाजता राजस्थान येथील आंबेडकरी कार्यकर्ते तथा पत्रकार भवर मेघवंशी यांच्या हस्ते या फेस्टिव्हलचे उद्घाटन होणार आहे. 

त्यानंतर पटकथा लेखक, साहित्यिक तथा पत्रकार संजय पवार यांचे 'लोकशाही आणि आंबेडकरी समाज' या विषयावर  विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. चेतन शिंदे, प्राचार्य प्रशांत शामकुवर, प्रा. महाजन यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी उत्कर्षा बोरीकर, प्रांजल सुरडकर यांचे स्वागतपर भीमगीतावरील नृत्याचे सादरीकरण होईल. 

त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते मा. न्यायाधीश मीनाक्षी धनराज, तंत्रशिक्षण सहसंचालक उमेश नागदेवे, शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, नांदेड येथील अक्षय भालेराव खून प्रकरणात मोफत विधी सेवा करणारे सिद्धार्थ डोंगरे, 'बा भीमा' या कॉमिक्स चे संपादक सूरज भोसले व गीता भोसले (वाघमारे) दलित अत्याचाराच्या घटनेत न्याय मिळवून देणारे वैभव गीते, शिक्षणतज्ञ डॉ.सुशील सूर्यवंशी, भुजंग खंदारे, मानसशास्त्र अभ्यासक दिपीका बनसोडे, ऍड.सिद्धार्थ शिंदे यांना मिलिंद सन्मान पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. तर रुपेश परतवाघ दिग्दर्शित व संदिप पाटील लिखित 'पेपर', श्रवण दंडवते दिग्दर्शित, मुरलीधर राणे व श्रवण दंडवते लिखित पिरॅमिड या लघुपटांना युगयात्रा पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment

Pages