किनवट,ता.२८ : हिंगोली लोकसभा मतदार संघात यंदाच्या (२०२४) सार्वत्रिक निवडणुकीसाठी हदगाव चे माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांना शिवसेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तर्फे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीमध्ये हिंगोली लोकसभेची जागा शिवसेनेला (उबाठा) सुटली आहे. बुधवारी (ता. २७) शिवसेनेकडून (उबाठा) प्रसिद्ध करण्यात आलेल्या लोकसभा उमेदवारांच्या यादीत हदगाव चे माजी आमदार नागेश पाटील आष्टिकर यांचा समावेश आहे.२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत एकत्रित असलेल्या शिवसेनेने हेमंत पाटील यांना उमेदवारी दिली होती.त्यांनी काँग्रेस पक्षाचे सुभाष वानखेडे यांचा पराभव करत काँग्रेस पक्षाकडून ही जागा हिसकावून घेतली होती.
No comments:
Post a Comment