किनवट, ता.२७ : गुढीपाडवा, डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त राज्य शासनाने 'आनंदाचा शिधा'चे वितरण करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे 'आनंदाचा शिधा'चा वाटप करण्याबाबत स्थानिक प्रशासन, रेशन दुकानदारांमध्येही संभ्रम तयार झाला आहे. दुसरीकडे लाभार्थी मात्र नाराज झाले आहेत.
पुढील एप्रिल महिना हा सणासुदीचा आहे. या महिन्यात गुढीपाडवा, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती,
श्रीराम नवमी, भगवान महावीर जयंती, श्री हनुमान जन्मोत्सव असे विविध सण उत्सव आहेत. सण-उत्सवाच्या काळात राज्य शासनाकडून स्वस्त धान्य दुकानांमध्ये पात्र लाभार्थीना आनंदाचा शिधाचे वितरण होते.मात्र, सध्या लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर रास्त धान्य दुकानातून सणोत्सवाकरीता मिळणारा आनंदाचा शिधा वाटप आचारसंहिता संपेपर्यंत बंद राहणार आहे.आचारसंहितेच्या बडग्यामुळे
वाटपास प्रतिबंध करण्यात आला आहे. मागील दीड वर्षाच्या कालावधीत एक किलो साखर, अर्धा किलो मैदा, एक किलो तेल, चणाडाळ या वस्तूचा संच तयार केला होता. या संचासाठी शंभर रुपये आकारण्यात आले होते. आता पुढील महिन्यात सणासुदीचा काळ असताना आनंदाचा शिधा ता. सात जूनपर्यंत वाटप न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गरजू लाभार्थीची गैरसोय होणार आहे.
No comments:
Post a Comment