आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Tuesday 26 March 2024

आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन

छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद):दरवर्षीप्रमाणे याही वर्षी  बाबा दळवी विचार मंच व इतर समविचारी संस्था- संघटनांच्या संयुक्त विद्यमाने आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांचा स्नेहमेळावा व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे.

२८ मार्च २०२४ गुरुवार रोजी  जनशिक्षण संस्थान, विजयेंद्र काबरा समाजकार्य महाविद्यालय, बंजारा कॉलनी, खोकडपुरा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनासमोर सायंकाळी ४ वाजता होणार आहे, कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अरुण शिरसाट असणार आहेत,

तर प्रमुख पाहुणे प्राचार्य डॉ. सतीश सुराणा आहेत,

यावेळी आंतरजातीय व आंतरधर्मीय विवाहितांचा सत्कार करण्यात येईल व त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात येणार आहे, आपापल्या अडीअडचणी मांडता येतील.तसेच शासनाकडे रखडलेले  अनुदान त्वरित मिळावे यासाठी आंदोलनाची भूमिका ठरविण्यात येणार आहे,

यावेळी  अंधश्रध्दा निर्मुलनाचे प्रयोग सादर करुन अनिष्ट रुढी- परंपरा, जात्यंधता,धर्मांधता आदींची होळी करण्यात येईल.लोककलावंतांची क्रांती गीतं ऐकता येतील.

-आंतरजातीय विवाहितांच्या यशकथा सांगण्यात येणार आहेत,कार्यक्रमाचा समारोप स्नेहभोजनाने होईल.

कृपया, सर्व जुन्या व नव्या जोडप्यांनी हा स्नेहमेळावा आपला स्वतःचा समजून सहभागी व्हावे व आपले प्रश्न सोडवून घेण्यासाठी जातीनिर्मुलनाच्या चळवळीचा धागा बनावे. सहकुटुंब यावे, अनेकांनी याकरिता सहभागी होण्यासाठी  प्रोत्साहन द्यावे, ही काळाची गरज आहे. मेळाव्यात जरुर या व व्यक्त व्हा. आपापल्या अडचणी सांगा, असे आवाहन बाबा दळवी विचार मंचचे संस्थापक अध्यक्ष स सो खंडाळकर,  सूरज जाधव, शहराध्यक्ष नितीन सिदवाडकर,मराठवाडा सरचिटणीस गणेश जाधव, जिल्हा कार्याध्यक्ष विनायक साळुंके, शहर सरचिटणीस

प्रा. प्रशांत साठे, विलास चंदने, जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था, 

एकनाथअण्णा त्रिभुवन, लोककला विकास मंचचे 

कांचन सदाशिवे, बहुजन सामाजिक- सांस्कृतिक मंचचे 

रामभाऊ पेटकर, प्रबुद्ध युवा मंचचे एन. एस. कांबळे व पंडितराव तुपे यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment

Pages