डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ‘आंतरजातीय विवाह : एक सामाजिक क्रांती’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 11 April 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ‘आंतरजातीय विवाह : एक सामाजिक क्रांती’ या विषयावर निबंध स्पर्धा आयोजन

पुणे :

अनहद सोशल फाऊंडेशनच्या राईट टू लव्ह प्रोजेक्ट अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३३ व्या जयंतीनिमित्त ‘आंतरजातीय विवाह : एक सामाजिक क्रांती’ या विषयावर निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे उद्दिष्ट या महत्वाच्या विषयावर सामाजिक जागरूकता निर्माण करणे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वाच्या मूल्यांना प्रोत्साहन देणे आहे.


स्पर्धेची माहिती:


 • ही स्पर्धा विद्यार्थी, शिक्षक, लेखक, सामाजिक कार्यकर्ते आणि सजग नागरिक सर्वांसाठी खुली आहे. 

 • निबंधाची शब्दमर्यादा: १००० ते १५०० शब्द

 • निबंध पाठवण्याचा अंतिम दिनांक: २५ एप्रिल २०२४

• स्पर्धेचा निकाल: २८ एप्रिल २०१४ 

 • सर्वोत्तम तीन निबंधांना आकर्षक भेटवस्तू आणि प्रमाणपत्र.

• सर्व सहभागी लेखकांसाठी प्रमाणपत्र. 

 • निबंध सबमिट करण्यासाठी :  anhadsocialfoundation@gmail.com

• सोबत तुमचे पूर्ण नाव, वय, कॉलेज/संस्था संपर्क क्रमांक देणे अनिवार्य आहे. 

• ⁠स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी 8329174614  वर संपर्क करा.


स्पर्धेचे महत्व:


आंतरजातीय विवाह हे समाजातील जाती पातीच्या आणि भेदभावांच्या भिंती तोडण्याचे एक प्रभावी माध्यम आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील समानता आणि बंधुत्वाच्या संकल्पनेला प्राधान्य दिले होते. त्यांच्या या विचारांचा पाठपुरावा करत असताना, ही स्पर्धा समाजातील संवेदनशीलता आणि सामाजिक बदलांसाठी एक मंच म्हणून काम करेल.


समाजातील बदलासाठी आपला विचार महत्वपूर्ण आहे. आपल्या लेखनाद्वारे, आपण समाजातील प्रगतीसाठी आणि समानतेसाठी एक महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतो.

असे आवाहन आयोजका तर्फे करण्यात आले आहे .

No comments:

Post a Comment

Pages