सम्राट अशोक जयंती निमित्त पी.ई.एस. मध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 17 April 2024

सम्राट अशोक जयंती निमित्त पी.ई.एस. मध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम

संभाजीनगर :

दिनांक १६ एप्रिल २०२४ रोजी, भारत राष्ट्राचे महान राजे सम्राट अशोक जयंती निमित्त शहरातील पी.ई.एस. पॉलिटेक्निक महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. 


टीम 'रन फॉर ईकव्यालिटी' च्या वतीने या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते, स्मार्ट सिटीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जोगदंड यांनी सम्राट अशोक कालीन इतिहासावर प्रकाश टाकला. परिवर्तनवादी महापुरुष्यांच्या क्रांतिकारी विचारांमुळे आज भारताला जगभरात महत्वाचा स्थान प्राप्त आसल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात भारत देशाची वाटचाल कशी असावी हे दर्शविण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सम्राट अशोक कालीन बौद्ध प्रतीकांचा समावेश भारतीय राज्यघटना बनवितानाच शासकीय दृष्टया करून घेतला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  राजा सम्राट अशोकाच्या जनकल्याणकारी राज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊनच भारतीय राज्यघटना बनविल्याचे रविंद्र जोगदंड यांनी सांगितले. 

कार्यक्रमास उपस्थित प्रमुख पाहुणे, एस.एस.ई.बी चे मुख्यअभियंता श्री. भुजंग खंदारे यांनी सम्राट अशोक यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकला. सम्राट अशोक कालीन स्तंभ व शिलालेखांची महत्वपूर्ण माहिती त्यांनी दिली. सम्राट अशोक त्यांच्या जीवनात एकही युद्ध हारले नाही परंतु त्यांना शेवटी युद्ध हा पर्याय नसून ते दुःखाच कारण आहे व जगाला युद्धाची नाही तर बुद्ध विचारांची गरज आहे हे त्यांना ज्या क्षणाला जाणवले तो क्षण त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट ठरला. असा टर्निंग पॉईंट आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात येत असतो तो ओळखून त्याप्रमाणे आपण आपले जीवन मार्गस्थ केले पाहिजे असे श्री. भुजंग खंदारे यांनी सांगितले.

 

पी.ई.एस. तंत्रनिकेतन चे प्राचार्य श्री. टी.ए. कदम यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महत्वाच्या ३ रत्नांचा उल्लेख करत, त्या रत्नांचे जतन करण्याचे आवाहन केले. 


अध्यक्षीय समारोप, घाटीच्या बालरोग विभाग प्रमुख सौ. डॉ. प्रभा खैरे यांच्या मार्गदर्शनाने झाला. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लौकिक खंदारे यांनी केले तर आभार प्रदर्शन अतुल पहिलवान यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ. अमित जोगदंड, डॉ. ज्योती खंदारे, अविनाश कांबळे, राहुल जाधव, यश थोरात, मोहन खंडागळे आदिंनी परिश्रम घेतले.


No comments:

Post a Comment

Pages