किनवट :
माध्यमिक परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून या परीक्षेत किनवट सारख्या डोंगरी आदीवासी भागातील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाने यावर्षी उज्ज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.सेमि इंग्रजी माध्यमचा निकाल 100% टक्के लागला असून मराठी माध्यमाचा 98.78 टक्के निकाल लागला असुन गुणवत्तेत मुलीनी बाजी मारली आहे.
कु.प्रिती जनार्धन दुधमल ही ९९.००% गुणांसह विद्यालय व
किनवट-माहुर-हिमायतनगर तालुक्यातुन सेमि माध्यमातून सर्वप्रथम येणाचा बहुमान प्राप्त केला आहे तर कु.समिक्षा प्रशांत डवरे 98.08% व कु.स्नेहल दत्ता कांबळे सामायिकपणे व्दितीय,कु.शितल नामदेव चाकुरे हीने 97.08% गुणांसह विद्यालयात तृतीय क्रमांक पटकावला आहे.तर मराठी माध्यमातुन कु.प्रतिक्षा राहुल पारधे ही 96.20% गुणांसह प्रथम, कु.जयश्री विजय कवडे 92.00% सह व्दितीय तर कु.पल्लवी अरविंद जाधव 91.60% सह तृतीय क्रमांक पटकावला आहे.
दहावी परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असुन या परीक्षेत मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ अंबाडी व्दारा संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यावर्षी घवघवीत यश संपादन केले आहे.इंग्रजी माध्यमातून एकूण 241प्रविष्ठ विद्यार्थ्यांपैकी 241 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त 73 विद्यार्थी, 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त 133 विद्यार्थी 60% पेक्षा जास्त गुण प्राप्त 31 विद्यार्थी आहेत तर व्दितीय श्रेणीत 04 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहे.
विशेष म्हणजे गणित या विषयामध्ये 100 पैकी 100 गुण प्राप्त करणारे 05 विद्यार्थी आणि विज्ञान या विषयात 100 पैकी 100 गुण घेणारे 05 विद्यार्थी आहेत.
मराठी माध्यमातुन 165 प्रविष्ट होते पैकी 163 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये 90% पेक्षा जास्त गुण प्राप्त 07 विद्यार्थी, 75% पेक्षा जास्त गुण प्राप्त 66 विद्यार्थी 60 % पेक्षा जास्त गुण प्राप्त 53 विद्यार्थी तर व्दितीय श्रेणीत उत्तीर्ण होणारे 37 विद्यार्थी आहेत. विद्यालयाचा एकुण निकाल हा 99.50 % एवढा लागला.
विद्यार्थ्यांनी दहावी परीक्षेत केलेली नेत्रदीपक कामगिरी निश्चित कौतुकास्पद आहे. या यशाबद्दल संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके, कोष्याधक्षा शुभांगीताई ठमके, मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, उपमुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर पर्यवेक्षक किशोर डांगे पर्यवेक्षक सुभाष सुर्यवंशी यांच्यासह शिक्षकवृंद व शाळेच्या कर्मचाऱ्याकडून गुणवंत विद्यार्थ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन केले जात आहे.
No comments:
Post a Comment