नांदेड:
राज्य सरकार कडून धर्मनिरपेक्ष तत्वाला पायदळी तुडवून शिक्षणाचे वैदिकीकरण करणे चालू आहे पुराण,मनुस्मुर्ती शिक्षणात शिकवून पुन्हा वर्ण व्यवस्था लागू करण्याचा त्यांचां प्रयत्न दिसत आहे सरकारचा ह्या धोरणा विरोधात महाराष्ट्र भर सम्यक विद्यार्थी आंदोलन मार्फत निवेदन देवून ह्या घटनेचा निषेध करण्यात आला त्याचं अश्याचे निवेदन नांदेड सम्यक विद्यार्थी आंदोलन मार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
ह्या वेळी आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर मामा सावंत,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष आतिश ढगे, महासचिव नागेश दुधमल सचिव अभय सोनकांबळे, तालुका अध्यक्ष ऋषभ महादळे उपाध्यक्ष रितेश गुळवे उपाध्यक्ष संदेश मोरे सचिव टिनू जोंधळे संघटक संघर्ष गोडबोले सदस्य रोहन सोनकांबळे आदी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment