बुद्ध लेणीच्या डोंगरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव लिहा ; रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 30 May 2024

बुद्ध लेणीच्या डोंगरावर डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव लिहा ; रिपब्लिकन बहुजन सेनेची मागणी

संभाजीनगर :

        ऐतिहासिक बुद्ध लेणीच्या पायथ्याशी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ वसलेले आहे. या बुद्ध लेणीच्या डोंगरावर १९८२-८५ च्या दरम्यान तत्कालीन मराठवाडा विद्यापीठाचे नाव कोरण्यात आले होते. त्यासाठी वनविभाग व जिल्हा प्रशसनाकडून ना-हरकत प्रमाणपत्र आणि आवश्यक त्या परवाणग्या मिळण्यात आल्या होत्या. परंतु मराठवाडा विद्यापीठाचे डॉ.बाबासाहेब आंबेडकर असे नामांतर झाल्यानंतर या डोंगरावरील नावात दुरुस्ती करून ते अद्ययावत करणे आवश्यक होते, परंतु त्याकडे विद्यापीठ प्रशसनाने हेतुतः दुर्लक्ष केले आहे.

         त्यामुळे बुद्ध लेणीच्या डोंगर माथ्यावर तातडीने ''डॉ.बाबासाहेब आंबेडकर मरठवाडा विद्यापीठ " असे नाव कोरण्यात यावे अन्यथा लोकशाही मार्गाने आंदोलन केले जाईल असे  रिपब्लिकन बहुजन सेनेचे मराठवाडा अध्यक्ष राहुल वडमारे यांनी विद्यापीठाचे कुलसचिव   यांच्याकडे एका निवेदनाद्वारे कळवले आहे .

No comments:

Post a Comment

Pages