शिलवान आणि वैचारिक पिढी घडवण्यासाठी लहान वयातच बालकांच्या हृदयावर धम्म कोरावा लागेल. - आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर सावंत - Middlepathnews

लाइव न्यूज़

Saturday 8 June 2024

शिलवान आणि वैचारिक पिढी घडवण्यासाठी लहान वयातच बालकांच्या हृदयावर धम्म कोरावा लागेल. - आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर सावंत

नांदेड - भारतीय बौद्ध महासभा व त्रिरत्न बुद्ध विहार व्यवस्थापन समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बाल संस्कार शिबीराचा समारोप त्रिरत्न विहार डॉ आंबेडकर नगर येथे आयोजित केला होता या बाल संस्कार शिबिराला 100 लहान बालकांनी सहभाग घेतला होता ह्या कार्यक्रमाच्या समारोपीय भाषणात आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते ईश्वर सावंत यानी वक्तव्य केले ह्या शिबिरात बहुतांश बालकांनी त्रिसरण, पंचशील,बुद्ध पूजा पाठ, त्रिरत्न वंदना, नरसिंह सूत,22 प्रतिज्ञा, धम्मध्वज सूत, जयमंगल अष्ठगाथा, महामंगलसुत मुख पाठ केलें, बौद्ध धम्माच्या बेस्कि गोष्टी सोप्या भाषेत बौद्धचारी रवीकिरण जोंधळे यांनी शिकवल्या ह्या कार्यक्रमाचे नियोजन ईश्वर मामा सावंत,सुजाता महिला मंडळच्या अध्यक्ष शांताबाई धुताडे, अरूण कांबळे, शेषेराव वाघमारे, आतिश ढगे, ऋषभ महादले, संदेश मोरे, सौरभ महादले,गोटु इंगळे,आदींनी केलें कार्यक्रमा नंतर उपस्थित बालकांना भोजनाचा स्वाद देण्यात आला व इंजी अमोल गोणारकर यांच्या कडून मिठाई वाटप करण्यात आली. ह्यावेळी उपासक उपासिका उपस्थित होत्या.



No comments:

Post a Comment

Pages