किनवट, दि.13(प्रतिनिधी) : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेडचे कै. श्री. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र किनवट येथे २०२४-२५ या शैक्षणिक वर्षात नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण- २०२० नुसार एमएसडब्ल्यू व बीएसडब्ल्यू तसेच बीसीए या अभ्यासक्रमासाठी प्रथम वर्षात प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे.
किनवट, माहूर परीसरातील विद्यार्थ्यांना सदरील अभ्यासक्रमाचे शिक्षण घेण्यासाठी नांदेड, संभाजीनगर, पुणे, मुंबई कडे जाण्याची गरज नाही. या भागातील सर्व विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण प्राप्त करण्याची ही उत्तम संधी आहे. तरी विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी येथील केंद्राला भेट द्यावी, असे आवाहन कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी आवाहन केले आहे
No comments:
Post a Comment