महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २६१ मुलींना मोफत सायकलीचे वाटप - Middlepathnews

लाइव न्यूज़

Sunday 30 June 2024

महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २६१ मुलींना मोफत सायकलीचे वाटप

किनवट : मुलींनी शाळेत वेळेवर पोहचावे,शाळेचा खंड पडु नये याची काळजी घेण्याच्या उद्देशाने 

मानव विकास योजनाने अंतर्गत गाव ते शाळा ५ किमी अंतरावर ये जा करणाऱ्या इयत्ता ८ ते १२ तील मुलीनां मोफत सायकल वाटप कार्यक्रम महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा(ता . किनवट)येथे नुकताच घेण्यात आला.

    अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव अभि.प्रशांत ठमके हे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून   गणू जाधव,केंद्र प्रमुख नया कँप,रवी नेमान्नीवार, केंद्रीय मुख्याध्यापक नया कँप,उत्तम कांनिदे  समन्वयक,मानव विकास कार्यक्रम,पं.स.किनवट,एस.व्ही.रमनाराव,  प्राचार्य एम.के.टी इंग्लिश स्कूल कोठारी (चि),अक्रम भाई,जी.एम.कृष्णानंद, इंफ्रा नागपूर,शामराव डोंगरे, डी.पी.एम. कृष्णानंद इंफ्रा, नागपूर आदी उपस्थित होते. 

      प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले यांच्या प्रतिमेस दीप -पूष्प-धूप  अर्पण करून अभिवान करण्यात आले.जिल्हा नियोजन समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, शिक्षणाधिकारी (मा.) माधव सलगर, शिक्षणाधिकारी (प्रा.) डॉ. सविता बिरगे यांच्या मार्गदर्शनाखाली गट शिक्षणाधिकारी ज्ञानोबा बने यांनी सन २०२३-२४ या शैक्षणिक वर्षाकरिता गोकुंदा येथील महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील २६१ मुलींना सायकली मोफत वाटप करण्यात आल्या.

 कार्यक्रमांचे सूत्रसंचालन नरेंद्र कानिंदे यांनी केले तर,आभार ज्ञानेश्वर कदम यांनी मानले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्राचार्य तथा मुख्याध्यापक अंबादास जुनगरे, उपप्राचार्य राधेश्याम जाधव,उप मुख्याध्यापक प्रमोद मुनेश्वर, पर्यवेक्षक संतोष ठाकूर, पर्यवेक्षक रघुनाथ इंगळे, पर्यवेक्षक किशोर डांगे, पर्यवेक्षक सुभाष सूर्यवंशी व विद्यालयाचे शिक्षकवृंद  यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी,पालक व परिसरातील नागरिक उपस्थित होते.



No comments:

Post a Comment

Pages