दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी - डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 July 2024

दीक्षाभूमीची जागा बौद्ध महासभेच्या ताब्यात द्यावी - डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर

नागपूर: दीक्षाभूमीची जागा शासकीय आदेशानुसार भारतीय बौध्द महासभाच्या ताब्यात द्यावी ही मागणी व त्यासंदर्भातील दस्तावेज आज नागपुरच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात येतील अशी माहिती भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी दिली. ते आज नागपूर दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी रवी भवन येथे माध्यमांशी संवाद साधला.


मागील अनेक दिवसांपासून दीक्षाभूमीवरील होत असलेल्या अंडरग्राऊंड पार्किंगच्या विरोधात आंबेडकरी जनता आंदोलने, निवेदने आणि मोर्चे काढत होते. मात्र याची प्रशासनाने दखल न घेता कामकाज सुरूच ठेवले होते, मात्र सोमवार(दि.१) रोजी आंबेडकरी जनता आक्रमक झाली आणि त्यांनी कामकाज बंद केले. याची दखल घेत शासनाने या कामकाजावर स्थगिती आणली. याच पार्श्वभूमीवर भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉ. भीमराव यशवंत आंबेडकर यांनी नागपूर येथे भेट दिली आहे.

No comments:

Post a Comment

Pages