दीपक कदम यांना पितृशोक संभाजीराव कदम यांचे निधन - Middlepathnews

लाइव न्यूज़

Friday 5 July 2024

दीपक कदम यांना पितृशोक संभाजीराव कदम यांचे निधन


नांदेड: नांदेड जि. प. च्या आरोग्य विभागातील सेवानिवृत्त कर्मचारी (कुष्टरोग तंत्रज्ञ) संभाजीराव केरबाजी कदम कंधारकर (वय-८६ वर्षे, रा. सिडको, नांदेड) यांचे शुक्रवार दि. ५ जुलै रोजी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

दिवंगत संभाजीराव कदम कंधारकर यांच्या पार्थिव देहावर शनिवार दि. ६ जुलै रोजी दुपारी १२ वाजता नांदेडच्या 'सिडको' वसाहतीअंतर्गत 'वैकुंठधाम' स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, चार मुली, जावई व नातवंडे असा परिवार आहे. नांदेड येथील आंबेडकरवादी मिशन केंद्र प्रमुख दीपक कदम कंधारकर यांचे 'ते' वडील होत.

No comments:

Post a Comment

Pages