डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग दर्शवणारे नाटक येत्या २५जुन रोजी एन.के गार्डन किनवट येथे होणार सादर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Monday 24 June 2024

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील महत्वाचे प्रसंग दर्शवणारे नाटक येत्या २५जुन रोजी एन.के गार्डन किनवट येथे होणार सादर

किनवट:

     भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा किनवट आयोजित अभ्युदया आर्ट अकादमी हैद्राबाद या नाट्य संस्थेच्या वतीने दि.२५/६/२०२४रोजी सायंकाळी ठिक ७:००वाजता एन. के.गार्डन किनवट येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक घटना व प्रसंग  अभिनयातून उलगडून दाखवणारे एक नाटक सादर होणार आहे. यातील कलावंतांतर्फे तेलंगणा राज्यात या नाटकाचे असंख्य प्रयोग सादर करण्यात आले.भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष अभियंता प्रशांत ठमके साहेब यांच्या पुढाकाराने हे नाटक सादर होणार आहे .डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित हे नाटक सर्व तालुका शाखा पदाधिकारी, वार्ड शाखा पदाधिकारी, कार्यकर्ते बौद्ध उपासक उपासिका व आंबेडकर प्रेमी रसिकांनी आपल्या परिवारासह अवश्य पहावे असे आवाहन करण्यात येत आहे.No comments:

Post a Comment

Pages