सामाजिक न्याय दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न ! - Middlepathnews

लाइव न्यूज़

Wednesday 26 June 2024

सामाजिक न्याय दिन आणि गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न !

किनवट :मिलिंद शिक्षण प्रसारक मंडळ, अंबाडी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोकुंदा व मातोश्री कमलताई ठमके बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, गोकुंदा(ता.किनवट) व्दारा संचलित मातोश्री कमलताई ठमके विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोकुंदा (ता. किनवट)यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज जयंती निमित्य सामाजिक न्याय दिन व शालेय जीवनातील महत्वाचा टप्पा आणि विद्यार्थ्याच्या भावी वाटचालीची दिशा ठरविणाऱ्या १० वी व १२ वी परीक्षेतील गुणवंताचा व वैद्यकीय प्रवेशास पात्र विद्यार्थी तसेच त्यांच्या पाल्यांचा सत्कार समारंभ गोकुंदा रोड स्थित एन.के.गार्डन येथे नुकताच संपन्न झाला.


यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार भीमराव केराम, प्रमुख पाहुणे कावलि मेघना ,सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्पाधिकारी,एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट,सुनिल बिर्ला,पोलिस निरिक्षक, पोलिस स्टेशन,किनवट, राजेंद्र शेळके, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,प्रेमसिंग आडे, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,प्रदीप नाईक, सहाय्यक प्रकल्प अधिकारी,दत्तात्रय डोंगशेनवार,शुभांगीताई ठमके, प्राचार्या म.ज्यो.फुले मा.व.उ.मा.वि.घोटी (ता.किनवट),संस्थेचे सचिव अभियंता प्रशांत ठमके,माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, गणु जाधव, केंद्र प्रमुख,नया कॅंप,संतोष मरसकोल्हे,  ॲड.मिलिंद सर्पे,गोकुळ भवरे,किरण ठाकरे,दत्ता जायभाये आदी मान्यवर उपस्थित होते.

     प्रारंभी मान्यवरच्या हस्ते महापुरुषाच्या प्रतिमाचे दीप-धूप-पूष्प अर्पण करुन पुजन करण्यात आले. प्रास्ताविकात प्राचार्य तथा मुख्याध्यापक अंबादास जुनगरे यांनी संस्थेच्या प्रगतीचा आलेख कसा उंचावत जात आहे याचे सविस्तर विवरण केले.


  या सत्कार समारंभात संस्थेच्या सलंग्न असलेल्या महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, महात्मा ज्योतिबा फुले उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा, मातोश्री कमलताई ठमके इंग्लिश मेडीयम स्कुल कोठारी, महात्मा ज्योतिबा फुले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, घोटी, मातोश्री कमलताई ठमके माध्यमिक विद्यालय सुभाषनगर, किनवट, मातोश्री कमलताई ठमके उच्च माध्यमिक विद्यालय, गोकुंदा या मधील १० वी १२ वी परीक्षेतील प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांक मिळवणारे गुणवंत, वैद्यकिय प्रवेशास पात्र गुणवंत व  पाल्यांचा सत्कार शाल, पुष्पहार व ग्रंथभेट देवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

प्रमुख पाहूणे म्हणून आपले मनोगत व्यक्त  करत असतांना कावली मेघना, सहाय्यक जिल्हाधिकारी यांनी विद्यार्थ्यांच्या अंगी शिस्त, सदाचार अभ्यास करण्याची जिद्द व बिकट परिस्थितीला सामोरे जाण्याचे गुण अंगीकारले पाहीजे.जेणे करूण आपले ध्येय साध्य करता येईल असा मौलीक संदेश त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.

  अध्यक्षिय समारोप करताना मा. आमदार भिमराव केराम यांनी विद्यार्थ्यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी विद्यार्थ्यांना सांगीतलेली माऱ्याच्या व मोक्याच्या जागा काबिज करा या प्ररेणादायी शब्दांची आठवण करून दिली. तसेच किनवट सारख्या आदिवासी भागात ठमके दामपत्यांनी शिक्षणाच्या माध्यमातून जे कार्य करत आहे ते वाखण्याजोगे आहेत, असे गौरवोद्गार काढले. तसेच हा गुणवंताचा सत्कार सोहळा घडवून आणला याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय व कनिष्ठ व संलग्न सर्व विद्यालये व कनिष्ठ  महाविद्यालयाचे सर्व पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

   कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन पर्यवेक्षक प्रा. संतोषसिंह बैसठाकूर यांनी केले ,तर आभार प्रज्ञा पाटील यांनी मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्य, उपमुख्याध्यापक पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षिका प्राध्यापक शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी पुढाकार घेतला. या समारंभास मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, विद्यार्थीनी, परिसरातील नागरीक व विविध वृत्तपत्रातील पत्रकार उपस्थित होते.


No comments:

Post a Comment

Pages