मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुनेत्रा अजित पवार यांची राज्यसभेवर वर्णी लागली आहे. सुनेत्रा पवार यांची राज्यसभा सदस्य म्हणून निवड झाल्याची घोषणा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे सचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांनी केली आहे.
राज्यसभा सदस्य प्रफुल्ल पटेल यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या एका जागेसाठी (महाराष्ट्र विधानसभा सदस्यांद्वारे निवडून दिल्या जाणाऱ्या) ही पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली होती. त्यासाठी सुनेत्रा पवार यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची राज्यसभेवर निवड झाल्याचे घोषित करण्यात आले.
बारामती लोकसभा मतदार संघातील पराभवानंतर राज्यसभेवर निवड
बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक देशभरात चर्चेत राहिली. बारामती मध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांच्या विरुद्ध राष्ट्रवादीच्या सुनेत्रा पवार यांच्यात लोकसभेची लढत झाली. नणंद विरुद्ध भावजय अशी ही लढत असल्याने याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. निवडणुकीत शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावण्यात आली आहे.
No comments:
Post a Comment