गोवेली प्रतिनिधी: आजच्या धकाधकीच्या काळात योगासनाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत चालले आहेत नियमितपणे योग केल्याने मज्जासंस्थेतील अनेक हार्मोन्स स्थिर होतात तसेच हे आपल्याला अधिक सकारात्मक होण्यास मदत करतात आणि आपला जीवनाकडे ताजेतवाने आणि सकारात्मक दृष्टिकोनाने पाहण्याचा कल वाढतो नियमितपणाने योग केल्याने रागावर नियंत्रण राहते. योग मुळे श्वासोच्छवास , ध्यान मज्जा संस्था शांत राहतात ज्यामुळे राग कमी होतो 21 जून नंतर पृथ्वीचा अक्ष त्याच्या कमाल कोणात सूर्याकडे झुकतो त्यामुळे हा दिवस मोठा असतो 21 जून नंतर सूर्य दक्षिणायणात प्रवेश करतो त्यामुळे योगासाठी हा दिवस खूप खास मानला जातो त्यामुळे 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून सर्वत्र साजरा केला जातो जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचलित कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय गोवेली येथे देखील हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला गेला.
या योग दिनाचे औचित साधून पतंजली योग समिती टिटवाळा येथील जयराम भोईर,रमेश श्रीवास्तव तसेच काशिनाथ धुमाळ या उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व लक्षात आणून देऊन विद्यार्थ्यांकडून प्रत्यक्षरीत्या योग करून घेतले यावेळेस जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंदे ,कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य प्रकाश रोहणे,मुख्याध्यापिका भावना कुंभार उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांची उपस्थिती लाभली होती. यामध्ये , प्राध्यापक व शिक्षक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नरेश टेंबे यांनी केले विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
No comments:
Post a Comment