गोवेली (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील मुलांच्या भवितव्यासाठी खडतर परिस्थितीवर मात करत माननीय श्री रवींद्र घोडविंदे यांनी जीवनदीप नावाच ज्ञान संकुल उभारलं आणि वर्षांपूर्वी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतर झाले आज जीवनदीप शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आज या जीवनदीप शैक्षणिक संस्थेचा २०वा वर्धापन दिन होता.
या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. वाढत चाललेल्या तापमानाचा उच्चांक आणि वाढत्या आधुनिकीकरणामुळे होणारी वृक्षतोड लक्षात घेता प्रत्येकाला त्याबाबत जागृत करणे गरजेचे आहे म्हणूनच वर्धापन दिनाच्या निमित्ताने जीवनदीप महाविद्यालयात जवळपास 60 वृक्षांची लागवड करण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून श्री.भाऊ गोंधळी जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र घोडविंडे सौ. स्मिता घोडविंदे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांची उपस्थिती लाभली होती. या विद्यार्थी आणि शिक्षक वृंद यामध्ये मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.दिनेश धनगर,प्रा. अपर्णा जाधव स्वयंसेवक यांचे योगदान व सहकार्य लाभले.
No comments:
Post a Comment