नांदेड (प्रतिनिधी)-
संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत मराठी माणसाला खऱ्या अर्थाने जागृत करण्याचे काम साहित्यरत्न अण्णाभाऊ यांनी केले असे प्रतिपादन डॉ. गोपाळ तिवारी यांनी केले.
श्री गुरुगोविंदसिंघजी पत्रकारिता महाविद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या स्मृतिदिनानिमित अभिवादन कार्यक्रम करण्यात आला. प्राचार्य डॉ.विकास कदम कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. डॉ. गोपाळ तिवारी यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी पुढे बोलताना प्रा. डॉ. गोपाळ तिवारी म्हणाले,
साहित्य, कथा, कादंबरी, कविता, पटकथा अशा विविधांगी लेखनातून अण्णाभाऊंची साहित्य संपदा समृद्ध झाली आहे.
याप्रसंगी प्रा. अमोल धुळे , प्रा. विपिन कदम , प्रा. संजय नरवाडे तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी, बालाजी कुलकर्णी , रोहित माळी , कुणाल भुरे , आदित्य कुंठे , विद्यार्थी व विद्यार्थिनी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment