गोवेली (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी तसेच त्यांना उच्च शिक्षण घेता यावे या उद्देशाने मा. श्री रवींद्र घोडविंदे यांनी गोवेली या ठिकाणी जीवनदीप शैक्षणिक संस्था नावाचे छोटेसे रोपटे लावले होते आणि आज या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झालेले आहे आणि आज त्या वटवृक्षाच्या शाखा म्हसा, खर्डी, टिटवाळा,मुरबाड या ठिकाणी पसरलेल्या आहेत.आज ठाणे जिल्ह्यातील' जीवनदीप शैक्षणिक संस्था'एक प्रसिद्ध नावाजलेली संस्था म्हणून ओळखली जाते आणि आज दिनांक 13 जुलै 2024 रोजी या संस्थेचा विसावा वर्धापन दिन साजरा करण्यात आला या वर्धापन दिनाच्या औचित्य साधून जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे दहावी आणि बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा 'विद्यार्थी गुणगौरव सोहळा 'आणि 'जीवनदीप गौरव सन्मान' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राज्य परिवहन मंडळाचे ठाणे जिल्हा विभाग नियंत्रक विलास राठोड,यांची उपस्थिती लाभली होती उपस्थित मान्यवरांचे सत्कार करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.बी कोरे यांनी केले या सोहळ्याप्रसंगी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते 'जीवनदीप इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजी' चे उद्घाटन करण्यात आले तसेच जीवनदीप विशेष अंक सुद्धा प्रकाशित करण्यात आला.त्यानंतर उपस्थित मान्यवरांपैकी राजाभाऊ चौधरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यात त्यांनी घोडविंदे सरांनी जीवनदीप शैक्षणिक संस्थेसाठी केलेले प्रयत्न सांगितले तसेच त्यांच्या कारकिर्दीचा आढावा घेतला. त्यानंतर घोडविंदे सरांनी त्यांच्या मनोगतच सर्वांनी साथ दिली, सहकार्य केलं म्हणून आज इथपर्यंत पोहोचलो.ठाणे जिल्ह्यात जास्त विद्यार्थी असलेली आपली जीवनदीप संस्था आहे या संस्थेच्या विकासाला सर्वांनी एकत्र मिळून साथ द्या असे सांगितले .त्यानंतर दहावी आणि बारावी परीक्षेत गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये कौतुकास्पद उल्लेखनीय कामगिरी केलेल्यांना जीवनदीप गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले त्यात 25 वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत असलेले भगवानजी मंडलिक, कोकण रत्न,कीर्तनकार, प्रवचनकार ह.भ.प.दशरथ महाराज केणे, महिला बचत गटाच्या सी आर पी जयवंती ताई लोणे ,बदलापूर जांभूळचे पेटन मिळवणारे कृषी मित्र आदित्यजी गोळे ,जागृती विद्यालय दहागावचे मुख्याध्यापक पद्माकरजी कोर, शहाडचे समाजसेवक केशव ओवळेकर, टिटवाळाचे समाजसेवक रवींद्रजी बिरारी ,यांना जीवनदीप गौरव पुरस्काराने गौरविण्यात आले .तसेच परिसरातील शाळा महाविद्यालयातील दहावी बारवी विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. सतीश लकडे,प्रा. नरेश टेंभे व प्रा स्नेहा भोंडीवले यांनी केले. याप्रसंगी राजाभाऊ पातकर,नारायण बाबा घोडविंदे, मंगेश भाऊ बनकरी, दीपक जाधव , राजाभाऊ चौधरी, जानू बुटेरे, रविंद्र घोडविंदे सर,स्मिता घोडविंदे मॅडम,प्रशांत घोडविंदे,यशवंत राऊत,बबन कोर,नितीन मोहपे,शांताराम भाऊ भोईर,बाळाराम कोर , पद्माकर हरड,नेताजी भोईर, पूजा जाधव,दिपाली बुटेरे,राजू मगर ,कमलाकर राऊत,अरविंद मिरकूटे,माणिक मगर,सी एस पाटिल,संजय शेलार,जगन जाधव,रविंद्र जाधव,जयराम लोणे,चंद्रकांत भोईर,सखाराम जाधव,राजेंद्र बांगर,गणेश जाधव,शेखर लोणे, दिलिप बुटेरे,शंकर भोईर,विलास खरे,अमर बनकरी ,गणेश शेलार, प्राचार्य के बी कोरे ,प्राचार्य प्रकाश रोहणे , उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे,शिक्षकवृंद आणि विद्यार्थी यांच्या उपस्थितीने कार्यक्रम संपन्न झाला .
No comments:
Post a Comment