किनवट नगरपरिषदची अतिक्रमण,विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही ; मुख्यधिकारी काकडे ॲक्शन मोडवर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 11 July 2024

किनवट नगरपरिषदची अतिक्रमण,विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक कार्यवाही ; मुख्यधिकारी काकडे ॲक्शन मोडवर

 किनवट : नगर परिषदच्या वतिने काल शहारातील शिवाजी महाराज चौक परीसर,मच्छी मार्केट परीसर,जिजामाता चौक परिसरात अतिक्रमण, विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदीची धडक मोहीम राबिविण्यात आली.

मोहिमेअतर्गंत प्लास्टिक बंदी  अनुषंगाने शहारातील दारु भट्टी चालकाकडुन ५ हजार रूपयांचा दंड आकारण्यात आला. शिवाजी महाराज चौक ते जिजामाता चौक परिसरात वर्षोन वर्षे असलेले अतिक्रमन धारक,व्यापारी,फेरीवाले यांचा नाहक ञास वाहतुकीस, नांगरीकांना होत होता,वारवांर सुचना देऊन सुध्दा अतिक्रमण धारक ऎकत नसल्याले शेवटी धडक मोहीम राबवून अतिक्रमण धारकांचे साहित्य,टेबल,जार,बकीटी,कॅरेट,वजन काटे,विना परवानगी बॅनर, इतर साहित्य जप्तीची कार्यवाही करण्यात आली.

तसेच मोहिमे अतर्गंत 25 कि.लो प्लास्टिक जप्त करण्यात असून 

या धडक कार्यवाहीमुळे नगर परिषदेचे मुख्यधिकारी अक्शन मोडवर आले असल्याची चर्चा सामान्य नागरीकांकडुन करण्यात येत आहे.

शहरातील व्यापरी, अतिक्रमण धारक,फेरीवाले, विना परवानगी बॅनर धारकांनी यापुढे नगर परिषदेच्या हद्दीत अतिक्रमण करु नये, अतिक्रमन केल्यास अतिक्रमण निष्कासित करण्याची कार्यवाही अशीच मोहीम सुरु राहील.असे आवहाण देखील केले.

सदर अतिक्रमण निष्कासित, विना परवानगी बॅनर, प्लास्टिक बंदी करण्याच्या मोहिमेत यावेळी नगरपरिषदेचे कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी मुगाजी काकडे साहेब,पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रमुख अशोक भालेराव,अभियतां विनोद पवार,नगर रचना विभाग प्रमुख,स्वानंद मामाडीडवार,क्षेञीय अधिकारी किरन कोलगुटवार,अतिक खान,स.जम्मीर,राजु पिल्लेवार,संदीप ढंडोरे,उमेश ढंडोरे ,शेख रियाज,गजानंन गाडेगे,रवी उपरपवार आदि स्वछ्ता विभागाचे कर्मचारी उपस्थित होते.

तर यावेळी पि.एस.आय सागर झाडे,पोलीस हवलादार वाडगुरे यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.



No comments:

Post a Comment

Pages