गोवेली (प्रतिनिधी ) : जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष श्री.रविंद्र घोडविंदे सर यांच्या संकल्पनेतून दरवर्षी महाविद्यालयात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येतात याचाच एक भाग म्हणून आज हरवत चाललेल्या निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठीच्या उद्देशाने महाविद्यालयात हरवत चाललेल्या निसर्गाचे महत्त्व लक्षात घेऊन आजच्या तरुण पिढीला जागृत करण्यासाठी निमित्त मिळालं हे या रानभाज्या पाककला स्पर्धेच दि.८जुलै रोजी जीवनदीप महाविद्यालय गोवेली येथे राष्ट्रीय सेवा योजना, भूगोल विभाग ,ग्रीन क्लब आणि महिला विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या प्रदर्शन आणि रानभाज्या पालकाला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून पर्यावरण दक्षता मंडळाचे माननीय श्री सुभाष इसामे देवराई समन्वयक देवेश जाधव तसेच जीवन शैक्षणिक संस्थेच्या संचालिका सौ स्मिता घोडविंदे यांची उपस्थिती लाभली . या स्पर्धेमध्ये विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. या स्पर्धेच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी स्वतः रानावनात जाऊन निसर्गातल्या विविध भाज्यांची ओळख करून घेतली या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या श्री सुभाष ईसामे यांनी विविध प्रकारच्या रानभाज्या आणि त्यांच्या औषधी गुणधर्मान विषयी मार्गदर्शन केले तसेच घोडविंदे मॅडम यांनी त्यांच्या मनोगतात त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज वटवृक्षात रूपांतरण झाल्याचे उदाहरण देऊन विद्यार्थ्यांना निसर्गाचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी प्रेरित केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक सानिका मुथोलकर द्वितीय क्रमांक दक्षा लांडगे व तृतीय वैष्णवी मिस्त्री हिने पटकावला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सहभागी विद्यार्थ्यांचे कौतुक उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ.विजय हेराडे प्रा.दिनेश धनगर प्रा. जया देशमुख प्रा.अपर्णा जाधव प्रा. प्रवीण भालेराव प्राध्यापक ,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला.
Tuesday, 9 July 2024

जीवनदीप महाविद्यालयात रानभाजी पाककला स्पर्धा संपन्न
Tags
# महाराष्ट्र
Share This

सम्यक मिलिंद सर्पे
महाराष्ट्र
Labels:
महाराष्ट्र
Subscribe to:
Post Comments (Atom)
Author Details
M.A ,M.C.J.
No comments:
Post a Comment