किनवट (प्रतिनिधी) : लोकसेवक म्हटलं की त्यांची बदली ठरलेली असते, सेवेच्या काळातील अनुभवाची शिदोरी हीच आमच्या जमेची बाजू असते. या परिसरातील लोक अत्यंत मनमिळाऊ आहेत. प्रत्येक डाक सेवकांनी केलेल्या सहकार्यामुळेच उद्दिष्ट पुर्तीत आपण नेहमी जिल्ह्यात प्रथम येत राहिलोत, असे मनोगत मांडवी डाक कार्यालयाचे उप डाकपाल सुरेश काळे यांनी व्यक्त केले .
तीन वर्षाच्या सेवेनंतर विहित नियमानुसार त्यांची मांडवी कार्यालयातून नांदेड मुख्यालयात बदली झाल्या निमित्ताने मांडवी उप डाकपाल कार्यालयात अधिनिस्त डाक सेवकांच्यावतीने निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. तेव्हा सत्काराच्या उत्तरात श्री काळे हे व्यक्त झालेत.
निरोप समारंभाचे अध्यक्षस्थानी उमरी (बा.) येथील ज्येष्ठ डाक सेवक कैलास पाटील हे तर प्रमुख पाहुणे म्हणून दहेली तांडा येथील ज्येष्ठ डाक सेवक आत्माराम कोटरंगे हे मंचावर उपस्थित होते. दरम्यान,सर्व डाक सेवकांच्यावतीने लिंगीचे डाक सेवक पोचन्ना आटलावार यांनी श्री काळे यांचा शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार केला. यावेळी सर्व डाकसेवकानी बोलतांना उपडाकपाल काळेंचा माणुसकीचा प्रेमळ स्वभाव व मदत करण्याच्या दिलखुलास वृत्ती बाबत प्रकाश टाकला.
यावेळी जेष्ठ डाक सेवक रमेश दासरवार ,धर्मेंद्र ठाकूर, लखन राठोड, राहुल भूरे ,ज्ञानदा कांबळे,गौरी फड, अनिता शेगेवाड,सुजाता मुकेरा,उनकेश्वरचे संतोष नंदीकोंडावार, दिनेश जाधव, रवी दासरवार, डाक सेवक तुळसाबाई पुसणाके, दादाराव मोहुर्ले, रामकिशन जयस्वाल, नरसय्या पडकंठवार, गोविंद लोहकरे, दिनेश बासरवार, गजानन परचाके, स्वामी बासरवार , अस्मित वाघमारे, पांडुरंग पिठलेवाड इत्यादींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पाटोदा (बु.)चे डाक सेवक गजानन पांडे यांनी केले.
No comments:
Post a Comment