नांदेड :
भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७७ वा वर्धापनदिन दिनांक १५ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ८.०५ वाजता महानगरपालिका मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आले.
ध्वजारोहण संपन्न झाल्यावर महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक राष्ट्रगीत गायले तसेच पोलीस व महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने राष्ट्रध्वजास सलामी दिली.
याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त श्री. गिरीश कदम, उपायुक्त श्री. कारभारी दिवेकर, उपायुक्त स.अजितपालसिंघ संधु, मुख्य लेखापरीक्षक श्री तुकाराम भिसे, सहाय्यक संचालक नगररचना श्री. आलुरकर, नगर रचनाकार श्री. महेंद्र पवार, लेखाधिकारी श्री. श्रीनिवास चन्नावार, शहर अभियंता श्री. सुमंत पाटील, कार्यकारी अभियंता श्री. संघरत्न सोनसळे, कार्यकारी अभियंता श्री. शिवाजी बाबरे, सिस्टीम मॅनेजर श्री. सदाशिव पतंगे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी श्री. डॉ.सुरेशसिंह बिसेन, सहाय्यक आयुक्त श्री. संजय जाधव, श्री. मो.गुलाम सादेक, स्टेडियम व्यवस्थापक श्री. रमेश चौरे, उद्यान अधिक्षक डॉ.मिर्झा फरहतुल्ला बेग, क्षेत्रिय अधिकारी श्री. रावण सोनसळे, श्री. संभाजी काष्टेवाड, श्रीमती निलावती डावरे व अग्निशमन अधिकारी श्री केरोजी दासरे तसेच महापालिकेतील ईतर अधिकारी व कर्मचारी वर्गाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
त्याच प्रमाणे महानगरपालिकेचे अनेक माजी पदाधिकारी व माजी सन्माननीय सदस्य देखील या प्रसंगी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment