बहुजन समाज पक्षाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday 15 August 2024

बहुजन समाज पक्षाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर

जयवर्धन भोसीकर,नांदेड:

 दिनांक 14 ऑगस्ट 2024 रोजी बहुजन समाज पक्षाची नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर करण्यात आली. बहुजन समाज पक्षाचे जिल्हा कार्यालय, छत्रपती चौक नांदेड या ठिकाणी बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुश्री कुमारी बहण मायावतीजी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष  सुनील डोंगरे यांच्या सूचनेप्रमाणे महाराष्ट्र प्रदेश महासचिव तथा मराठवाडा झोन प्रभारी माननीय मुकुंद सोनवणे यांनी बसपाचे नांदेड जिल्हा कार्यकारणी जाहीर केली आहे.

कार्यकारणी पुढील प्रमाणे

जिल्हा अध्यक्ष - साहेबराव डाकोरे

जिल्हा उपाध्यक्ष - मारोती गायकवाड

जिल्हा उपाध्यक्ष - विठ्ठल कोटेवाड 

जिल्हा उपाध्यक्ष - माधव कंधारे

जिल्हा महासचिव - अविनाश इटकापल्ले

जिल्हा कोषाध्यक्ष - शिवाजी सोनटक्के

जिल्हा प्रसिध्दी प्रमुख सोशल मीडिया - सुशील सोनवणे


 सदरील बैठकीमध्ये बसपाचे प्रदेश सचिव माननीय अनिरुद्ध रणवीर, बसपाचे महाराष्ट्र प्रदेश सदस्य तथा नांदेड जिल्हा व हिंगोली जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक  विठ्ठल  घोडके, नांदेड जिल्हा प्रभारी विकी वाघमारे, बसपाचे नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष  साहेबरावजी डाकोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. सदरील निवडीच्या वेळी जिल्हा प्रभारी सुनील डोंगरे, दिगंबर मोरे, प्रदीप कसबे, सुरेश जोंधळे, विनायक लोहकरे, जय कुंटे, चिंतामणी पोहरे, सुशील सोनवणे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.


No comments:

Post a Comment

Pages