लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी - Middlepathnews

लाइव न्यूज़

Thursday, 1 August 2024

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी





किनवट,ता.१ : लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज(ता.१)सकाळी ११वाजता उत्साहात साजरी करण्यात आली.जयंतीचा मुख्य सोहळा बसस्थानकाजवळील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळ संपन्न झाला.यावेळी आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.उपस्थित मान्यवरांनी अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

     यानिमित्ताने झालेल्या प्रबोधन सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार प्रदिप नाईक हे होते. यावेळी प्राचार्य राजकुमार मस्के,उदगीर व भीमराव केराम यांनी समयोचित मार्गदर्शन केले.प्रमुख पाहुणे म्हणून  प्रा.रामप्रसाद तौर यांची मंचावर उपस्थिती होती.प्रास्ताविक मारोतराव सुंकलवाड यांनी केले तर, सूत्रसंचालन उत्तम कानिंदे यांनी केले.

    कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष व्यंकटराव नेम्मानिवार,माजी उपाध्यक्ष गंगारेड्डी बैनमवार, माजी नगराध्यक्ष इसाखान, माजी नगराध्यक्ष आनंद मच्छेवार, श्रीनिवास नेम्मानिवार,माजी नगराध्यक्ष अरुण आळणे,विनोद भरणे, वैजनाथ करपुडे पाटील,प्रभाकर बोड्डेवार, सुरेश जाधव, महेंद्र नरवाडे,राजेश पाटील,डॉ.आनंद भालेराव,माधव कावळे,के.मुर्ती,अॅड.हरीभाऊ दर्शनवाड, संतोष सिसले, मारोती भरकड,उषा धात्रक,भावना दिक्षित, सचिन नाईक, प्रदिप वाकोडीकर ,प्रमोद पोहरकर,अॅड.मिलिंद सर्पे,संतोष सिसले,प्रा .दगडू भरकड, आदिंची प्रमुख उपस्थिती होती.

    यशस्वीतेसाठी लक्ष्मीपती दोनपेल्लीवार,गंगाधर मुकनेपेल्लीवार,रमेश दिसलवार,नरेश माहूरकर,कामराज माडपेल्लिवार,रवी उप्परवार,भगवान माहूरकर आदिंनी पुढाकार घेतला.


No comments:

Post a Comment

Pages